
सोलापूर, 3 डिसेंबर (हिं.स.)। सोलापूर अजमेर या दरम्यान धावणारी साप्ताहिक विशेष रेल्वे सेवा सुरूच राहणार असून, ही रेल्वे सवाई, माधोपूर-कोटा ऐवजी अजमेर-चंदेरिया-कोटा या मार्गे धावणार आहे. या रेल्वेच्या वाढीव पाच फेऱ्या होतील.सोलापूर-अजमेर या साप्ताहिक विशेष रेल्वे 26 नोव्हेंबरपर्यंत धावणार होती. ती गाडी क्रमांक 09627 अजमेर-सोलापूर साप्ताहिक रेल्वे आता उद्या 3 ते 31 डिसेंबरपर्यंत दर बुधवारी धावणार असून या रेल्वेच्या वाढीव पाच फेऱ्या होतील. गाडी क्रमांक 09628 सोलापूर-अजमेर साप्ताहिक विशेष रेल्वे आता 4 डिसेंबर ते 1 जानेवारीपर्यंत दर गुरुवारी धावेल. याच्या वाढीव पाच फेऱ्या होतील.गाडी क्रमांक 09627 ही उद्या 3 डिसेंबर आणि ट्रेन क्रमांक 09628 ही 4 डिसेंबर रोजी अजमेर-सवाई माधोपूर-कोटा ऐवजी अजमेर-चंदेरिया-कोटा मार्गे वळवण्यात आली असून सदर गाडयांना बिजयनगर व भिलवाडा येथे थांबे दिले जातील. या गाड्यांच्या रचनेत आणि थांब्यांमध्ये कोणताही बदल केला नाही.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड