फ्लॅशबॅक-2025 : भारतासाठी 2025 सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध ठरले
नवी दिल्ली, 30 डिसेंबर (हिं.स.) भारतासाठी २०२५ हे वर्ष सांस्कृतिक उपलब्धींनी परिपूर्ण ठरले. प्रयागराज येथील महाकुंभात ‘कलाग्राम’च्या माध्यमातून देशाच्या मूर्त व अमूर्त सांस्कृतिक वारशाचे भव्य प्रदर्शन करण्यात आले. ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रीय गीताच्य
महाकुंभ लोगो


नवी दिल्ली, 30 डिसेंबर (हिं.स.) भारतासाठी २०२५ हे वर्ष सांस्कृतिक उपलब्धींनी परिपूर्ण ठरले. प्रयागराज येथील महाकुंभात ‘कलाग्राम’च्या माध्यमातून देशाच्या मूर्त व अमूर्त सांस्कृतिक वारशाचे भव्य प्रदर्शन करण्यात आले. ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रीय गीताच्या १५० वर्षांनिमित्त विविध समारंभांना सुरुवात झाली. दीपावलीचा युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीत समावेश झाला, तर मराठा सैनिकी परिदृश्याला जागतिक वारसास्थळाचा दर्जा प्राप्त झाला.

२०२५ हे वर्ष भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाच्या उत्सवाचे वर्ष ठरले.

उत्तरप्रदेशच्या प्रयागराज येथे आयोजित महाकुंभात ‘कलाग्राम’द्वारे देशाच्या मूर्त व अमूर्त वारशाचे दर्शन घडले. तसेच नोव्हेंबर महिन्यात ‘वंदे मातरम्’च्या १५० वर्षांनिमित्त वर्षभर चालणाऱ्या समारंभांचा शुभारंभ करण्यात आला. २०२५ चा शानदार शेवट दीपावलीचा युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीत समावेश होण्याने झाला. त्याचबरोबर मराठा सैनिकी परिदृश्याला जागतिक वारसा दर्जा मिळाला. एकूणच, २०२५ मध्ये संस्कृती मंत्रालयाचे वर्ष विविध कार्यक्रमांनी गजबजलेले होते.

संस्कृती मंत्रालयाने ‘ज्ञान भारतम’ हे पोर्टल सुरू करून हस्तलिखित वारशाचे डिजिटलीकरण केले आणि बुद्धांच्या पवित्र अवशेषांच्या परदेशातील प्रदर्शनांद्वारे सांस्कृतिक कूटनीती अधिक मजबूत केली.

जानेवारी–फेब्रुवारी दरम्यान प्रयागराज महाकुंभात उभारण्यात आलेल्या तंबू शहरात ‘कलाग्राम’च्या माध्यमातून भारताच्या सांस्कृतिक वारशाचे प्रदर्शन करण्यात आले. १०.२४ एकर क्षेत्रात उभारलेले ‘कलाग्राम’ हे एक संवेदनात्मक प्रवास म्हणून डिझाइन करण्यात आले होते.

यामध्ये भारताच्या सांस्कृतिक वारशाचे मूर्त व अमूर्त पैलू एकत्रितपणे सादर करण्यात आले. या विशेष प्रसंगाचे औचित्य साधून विविध केंद्र संरक्षित स्मारकांवर महाकुंभाचे लोगोही प्रदर्शित करण्यात आले.

नोव्हेंबर महिन्यात संस्कृती मंत्रालयाने राष्ट्रीय गीत ‘वंदे मातरम्’च्या १५० वर्षांनिमित्त वर्षभर चालणाऱ्या समारंभांची सुरुवात केली. भोपाळ येथे भव्य समारंभात अहिल्याबाई होळकर यांची ३०० वी जयंती साजरी करण्यात आली, तसेच देशभरात सरदार वल्लभभाई पटेल यांची १५० वी जयंती साजरी करण्यात आली.

२०२५ मध्ये भारताला अनेक महत्त्वाच्या उपलब्धी मिळाल्या. पहिली उपलब्धी ‘भारताचे मराठा सैनिकी परिदृश्य’ याला मिळाली. जुलै महिन्यात पॅरिस येथे झालेल्या जागतिक वारसा समितीच्या ४७ व्या अधिवेशनात याचा जागतिक वारसा यादीत समावेश करण्यात आला.

दुसरी मोठी उपलब्धी म्हणजे १० डिसेंबर रोजी दीपावलीचा युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारशाच्या प्रतिनिधी यादीत समावेश. मानवतेच्या अमूर्त सांस्कृतिक वारशाच्या प्रतिनिधी यादीत समाविष्ट होणारी ही भारताची १६ वी नोंद ठरली.

याशिवाय, डिसेंबर महिन्यात अमूर्त सांस्कृतिक वारशाच्या संरक्षणासाठी आंतरशासकीय समितीचे २० वे अधिवेशन दिल्लीतील लाल किल्ल्यावर आयोजित करण्यात आले. हा किल्ला युनेस्कोचा जागतिक वारसा स्थळ आहे. नोव्हेंबरमध्ये नवी दिल्लीतील राष्ट्रीय संग्रहालयात ठेवलेल्या अवशेषांपैकी काही अवशेष १७ दिवसांच्या सार्वजनिक प्रदर्शनासाठी भूतानची राजधानी थिंफू येथे नेण्यात आले.

संस्कृती मंत्रालयासाठी २०२५ हे वर्ष विशेष महत्त्वाचे ठरले, कारण सप्टेंबरमध्ये भारताच्या हस्तलिखित वारशाचे संरक्षण, डिजिटलीकरण आणि प्रसार करण्यासाठी ‘ज्ञान भारतम’ ही ऐतिहासिक राष्ट्रीय मोहीम सुरू करण्यात आली.

गेल्या

१२ सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘ज्ञान भारतम’ पोर्टलचे उद्घाटन केले. ‘विकसित भारत २०४७’ या संकल्पनेनुसार भारताच्या हस्तलिखित वारशाचे जतन व पुनरुज्जीवन करण्यासाठी भारताची कटिबद्धता यामधून अधोरेखित करण्यात आली.

आगामी २०२६ मध्ये सरकार श्रीलंकेत भगवान बुद्धांच्या पवित्र अवशेषांचे प्रदर्शन आयोजित करण्याची योजना आखत आहे. फेब्रुवारी महिन्यात कोलंबो येथे हे प्रदर्शन आयोजित करण्यात येणार आहे.-----------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande