
नाशिक, 31 डिसेंबर (हिं.स.)।
- सोशल. मीडियावर महिलेचे फोटो वापरून बलात्काराची धमकी देत चारित्र्यहनन करणारी पोस्ट टाकून महिलेचा ऑनलाईन विनयभंग केल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत नाशिक परिसरात राहणाऱ्या पीडित महिलेने सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले, की मार्च ते जून २०२५ यादरम्यान कोणी तरी अज्ञात महिलेने फिर्यादी महिलेचे नाव व फोटो वापरून बनावट फेसबुक अकाऊंट व बनावट इन्स्टाग्राम अकाऊंट तयार केले. त्यावर आरोपीने पीडित महिलेला बलात्काराची धमकी देणाऱ्या पोस्ट करून पीडितेचे चारित्र्यहनन करण्याच्या उद्देशाने त्यांचे वैयक्तिक फोटो वापरून शिवीगाळ केलेल्या पोस्ट व्हायरल केले. यामुळे पीडित महिलेचा विनयभंग झाला. या प्रकरणी अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक पिसे करीत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV