नाशकात देशी बनावटीच्या पिस्तूल, जिवंत काडतूसासह तरुणाला अटक
नाशिक, 31 डिसेंबर (हिं.स.)। :- शस्त्रबंदी मनाई आदेशाचे उल्लंघन करून देशी बनावटीचे पिस्तूल आणि जिवंत काडतूस बाळगणाऱ्या तरुणाविरुद्ध देवळाली गाव येथे कारवाई करण्यात आली आहे. याबाबत पोलीस हवालदार गणेश भागवत यांनी फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले, की आ
नाशकात देशी बनावटीच्या पिस्तूल, जिवंत काडतूसासह तरुणाला अटक


नाशिक, 31 डिसेंबर (हिं.स.)।

:- शस्त्रबंदी मनाई आदेशाचे उल्लंघन करून देशी बनावटीचे पिस्तूल आणि जिवंत काडतूस बाळगणाऱ्या तरुणाविरुद्ध देवळाली गाव येथे कारवाई करण्यात आली आहे.

याबाबत पोलीस हवालदार गणेश भागवत यांनी फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले, की आरोपी अनिकेत राजू जॉन ऊर्फ केरला (वय २५, रा. भारती मठ, सुभाष रोड, नाशिकरोड) हा दि रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास देवळाली गावातील राजवाडा परिसरात ३० हजार रुपये किमतीचे देशी बनावटीचे पिस्टल व एक हजार रुपये किमतीचे जिवंत काडतूस पँटच्या खिशात ठेवून बाळगताना मिळताना मिळून आला. या प्रकरणी अनिकेत केरलाविरुद्ध शस्त्रबंदी मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येऊन कारवाई करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस हवालदार टेमगर करीत आहेत

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande