चंद्रपुरात किडनी घेणारे व्यक्तीकडून ५० ते ८० लाख रुपयांपर्यंत रक्कम घेतली जात असल्याचे उघड
चंद्रपूर, 31 डिसेंबर (हिं.स.)। किडनी विक्री रॅकेट प्रकरणात प्राथमिक तपासात, किडनी घेणारे व्यक्तीकडून ५० लाख ते ८० लाख रु. पर्यंत रक्कम घेतली जात होती अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. यातील डॉ. रविंद्रपाल सिंग दिल्ली यास १० लाख रु., स्टॉर किम्स
चंद्रपुरात किडनी घेणारे व्यक्तीकडून ५० ते ८० लाख रुपयांपर्यंत रक्कम घेतली जात असल्याचे उघड


चंद्रपूर, 31 डिसेंबर (हिं.स.)।

किडनी विक्री रॅकेट प्रकरणात प्राथमिक तपासात, किडनी घेणारे व्यक्तीकडून ५० लाख ते ८० लाख रु. पर्यंत रक्कम घेतली जात होती अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.

यातील डॉ. रविंद्रपाल सिंग दिल्ली यास १० लाख रु., स्टॉर किम्स हॉस्पीटल चे संचालक डॉ. राजरत्नम गोंविदस्वामी यांना सर्जरी व हॉस्पीटीलीटी उपलब्ध करून देण्यासाठी २० लाख रु. तसेच क्रिष्णा उर्फ रामकृष्ण सुंचू यास व इतर लोकांना २० लाख रु. मिळत होते. किडनी देणाऱ्या व्यक्तीस फक्त ५ ते ८ लाख रु. देत होते

सदर गुन्हयाचे तपासात, स्थानिक गुन्हे शाखा (LCB) चंद्रपूर येथील पथक स्टॉर किम्स हॉस्पीटल त्रिची (तामीळनाडु) येथे गेले असुन हॉस्पीटल संचालक डॉ. राजरत्नम गोंविदस्वामी याचा शोध घेवुन त्याला ताब्यात घेण्याचा प्रयत्न सुरु आहे.

तसेच आणखी एक स्थानिक गुन्हे शाखा (LCB) पथकाने दिल्ली येथे डॉ. रविंद्रपाल सिंग यांना ताब्यात घेतले होते, त्यांना ट्रॉन्झीट रिमांड कामी दिल्ली येथील संबंधीत न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यास दिनांक २ जानेवारी २०२६ रोजी मुख्य न्यायदंडाधिकारी चंद्रपूर यांचे समक्ष प्रत्यक्ष हजर राहणे बाबत आदेश दिले असुन त्याबाबत पुढील तपास करण्यात येत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव


 rajesh pande