चंद्रपूर - भाजप महानगर जिल्हाध्यक्षपदावरून सुभाष कासमगुट्टावार यांची तडकाफडकी हकालपट्टी
चंद्रपूर, 31 डिसेंबर (हिं.स.)। चंद्रपूर भाजपचे महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टुवार यांना आज तडकाफडकी पदावरून काढून टाकण्यात आले. महापालिका निवडणुकीसाठी प्रदेशाध्यक्षांनी अंतिम केलेली यादी सुभाष कासनगोट्टुवार यांनी आपल्याच मताने बदलून टाकली. त्यांनी
चंद्रपूर - भाजप महानगर जिल्हाध्यक्षपदावरून सुभाष कासमगुट्टावार यांची तडकाफडकी हकालपट्टी


चंद्रपूर, 31 डिसेंबर (हिं.स.)।

चंद्रपूर भाजपचे महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टुवार यांना आज तडकाफडकी पदावरून काढून टाकण्यात आले. महापालिका निवडणुकीसाठी प्रदेशाध्यक्षांनी अंतिम केलेली यादी सुभाष कासनगोट्टुवार यांनी आपल्याच मताने बदलून टाकली. त्यांनी १० पेक्षा अधिक उमेदवार बदलून टाकले. प्रदेशाध्यक्षांचा हा अवमान असल्याने पक्षाने हे प्रकरण गांभीर्याने घेतले आणि आता त्यांना चंद्रपूर महानगर अध्यक्ष पदावरून तत्काळ प्रभावाने हटवण्यात आल्याचे पत्र जारी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव


 rajesh pande