डिजिटल सही असलेले उबाठाचे उमेदवारी अर्ज रद्द करा, नाशिक भाजपाची निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे मागणी
नाशिक, 31 डिसेंबर (हिं.स.)। - भाजपाचे नाशिक शहर अध्यक्ष सुनील केदार यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना पत्र देऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवारांचे निवडणूक अर्ज तात्काळ रद्द करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे नाशिकच्या राजकारणामध्
डिजिटल सही असलेले उबाठाचे उमेदवारी अर्ज रद्द करा, नाशिक भाजपाची निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे मागणी


नाशिक, 31 डिसेंबर (हिं.स.)।

- भाजपाचे नाशिक शहर अध्यक्ष सुनील केदार यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना पत्र देऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवारांचे निवडणूक अर्ज तात्काळ रद्द करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे नाशिकच्या राजकारणामध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की नाशिक महानगरपालिका निवडणुकीसाठी काल मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता उमेदवारी अर्ज दाखल करण्याबरोबरच राजकीय पक्षांची उमेदवारी ही अधिकृत आहे या स्वरूपाचा एबी फॉर्म हा दाखल करणे क्रमपात्र असल्याकारणाने तो देणे आवश्यक होते याबाबत भारतीय जनता पक्षाच्या वतीने मोठ्या प्रमाणावर गोंधळ झाला तरी देखील भाजपाने ओरिजनल म्हणजेच खरी सही असलेला एबी फॉर्म हा निवडणूक अर्धा बरोबर दाखल केला मात्र काही राजकीय पक्षांनी डिजिटल सही असलेला उमेदवारी अर्ज दाखल केला.

त्यामुळे बुधवारी भारतीय जनता पक्षाचे नासिक शहराध्यक्ष सुनील केदार यांनी पंचवटी येथील विभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांना लेखी पत्र देऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाच्या वतीने डिजिटल सही असलेले एबी फॉर्म जोडले गेले आहेत हे निदर्शनास आणून देऊन असे एबी फॉर्म हे कायद्याच्या नियमाप्रमाणे चालत नाही निवडणूक आयोगाने जे नियम घालून दिले आहे त्या पद्धतीने हे चुकीचे आहे त्यामुळे ते तत्काळ रद्द करावे अशी मागणी केली आहे याबाबत बुधवारी सायंकाळी उशिरापर्यंत कुठल्याही प्रकारचा निर्णय झाला नव्हता गुरुवारी याबाबतचा निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे त्यामुळे नाशिकमध्ये उबाठा शिवसेनेचे उमेदवार अडचणीत येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande