
लातूर, 31 डिसेंबर (हिं.स.)।
आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी लातूर महानगरपालिका प्रशासन सतर्क झाले आहे. मनपा आयुक्त मानसी यांनी शहरातील विविध मतदान केंद्रांना प्रत्यक्ष भेटी देऊन तेथील व्यवस्थेची पाहणी केली.
प्रभागांनुसार पाहणी आणि दिलेल्या सूचना:
प्रभाग १३ (प्रकाश नगर/विशाल नगर): ज्ञानप्रकाश विद्यानिकेतन येथे बॅरिकेट्स, पिण्याचे पाणी आणि आसन व्यवस्था, तर निर्मलादेवी शाळेत रॅम्प व शौचालयांची सोय करण्याचे आदेश दिले.
प्रभाग ८ (दयाराम रोड): गोदावरी देवी लाहोटी कन्या शाळेत खिडक्यांना पडदे आणि मंडपाची सोय करण्याच्या सूचना केल्या.
प्रत्येक मतदाराला सन्मानाने आणि विनासायास मतदान करता यावे, यासाठी सर्व केंद्रांवर मूलभूत सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील, असे आश्वासन आयुक्तांनी यावेळी दिले.
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis