
रत्नागिरी, 31 डिसेंबर, (हिं. स.) : साहित्य संगम (मांद्रे, पेडणे, गोवा) या संस्थेचे संस्थापक कार्यवाह प्राचार्य गजानन हरिश्चंद्र मांद्रेकर यांच्या उपक्रमांद्वारे शिक्षण या पुस्तकाचे प्रकाशन येत्या शनिवारी मांद्रे (गोवा) येथे होणार आहे.
प्रा. मांद्रेकर यांच्या उपक्रमांद्वारे शिक्षण या पुस्तकात विद्यार्थी व शिक्षकांसाठी यशस्वीरीत्या राबविलेले नावीन्यपूर्ण उपक्रम समाविष्ट करण्यात आले आहेत. गोवा मराठी अकादमीने प्रकाशनपूर्व अनुदानाने हे पुस्तक गौरविले असून गोव्यातीलच श्रीविद्या प्रतिष्ठानने प्रकाशित केले आहे.
समारंभाचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ प्राचार्य सुभाष भास्कर वेलिंगकर भूषविणार असून प्रमुख अतिथी म्हणून मांद्रे मतदारसंघाचे आमदार जीत विनायक आरोलकर, तर विशेष निमंत्रित म्हणून उपस्थित राहणार आहेत.
गोवा मराठी अकादमीचे अध्यक्ष प्राचार्य अनिल गजानन सामंत, गोव्याचे शिक्षण उपसंचालक मनोज बाळकृष्ण सावईकर, विद्याभारतीचे अध्यक्ष डॉ. सीताराम विठ्ठल कोरगावकर, साहित्यिक तथा लोककला अभ्यासक सौ. पौर्णिमा राजेंद्र केरकर, मोरजीच्या जिल्हा परिषद सदस्य सौ. तारा बाबुसो हडफडकर, शिक्षण संचालक शैलेश सिनाय झिंगडे, पेडणे तालुका विकास परिषदेचे अध्यक्ष अॅड. रमाकांत दत्ताराम खलप, गोवा विद्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. राजेश गणपती भटकुर्स, श्रीविद्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष नितीन रमेश फळदेसाई, मांद्रे गावचे सरपंच रॉबर्ट फर्नांडिस, स्थानिक पंचसदस्य राजेश विनायक मांद्रेकर उपस्थित राहणार आहेत.
प्रकाशन समारंभ रविवार, दि. ४ जानेवारी रोजी सायंकाळी ४ वाजता मांद्रे (पेडणे) ग्रामपंचायत कार्यालयानजीक दीनदयाळ सभागृह होणार आहे. समारंभाला उपस्थित राहण्याचे आवाहन साहित्य संगमचे अध्यक्ष सुभाष काशिनाथ शेटगावकर आणि कार्यक्रमाचे संयोजक दिलीप न्हानू मेथर यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी