चंद्रपूर : राज्य आंतर विद्यापीठ क्रीडा महोत्सवाला सुरुवात
चंद्रपूर, 18 फेब्रुवारी (हिं.स.)।26 व्या महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ क्रीडा महोत्सवाला आजपासून चंद्रपूर, बल्लारपूर येथे सुरुवात झाली. त्यानिमित्त गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशान्त बोकारे यांनी स्पर्धानुरुप क्रीडा मैदानावर स्पर्धांची पाहण
चंद्रपूर: राज्य आंतर विद्यापीठ क्रीडा महोत्सवाला सुरुवात...  कुलगुरु डॉ. प्रशान्त बोकारे यांनी दिल्या खेळाडूंना शुभेच्छा


चंद्रपूर, 18 फेब्रुवारी (हिं.स.)।26 व्या महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ क्रीडा महोत्सवाला आजपासून चंद्रपूर, बल्लारपूर येथे सुरुवात झाली. त्यानिमित्त गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशान्त बोकारे यांनी स्पर्धानुरुप क्रीडा मैदानावर स्पर्धांची पाहणी करुन खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी बोलताना कुलगुरु म्हणाले, गोंडवाना विद्यापीठाने कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, बॅडमिंटन, टेबल टेनिस, ॲथलेटिक्स व चेस अशा आठ क्रीडा प्रकारांच्या स्पर्धांचे आयोजन केले असून यापूर्वी कुठल्याच विद्यापीठाकडून आठ क्रीडा प्रकारांचे आयोजन करण्यात आलेले नाही. सुरुवातीला काही आव्हाने, समस्या होत्या. मात्र, विद्यापीठातील सर्व अधिकारी, प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी या सर्वांनी त्या समस्या दूर केल्या आहेत आणि अतिशय उत्कृष्‍ट क्रीडा स्पर्धा पहायला मिळत आहेत असे सांगितले.

पहिल्याच दिवशी खेळाडूंमध्ये कमालीचे चैतन्य दिसत असून, पुढील चार दिवस याच चैतन्याने हे तारुण्य इथे राहील, जे जिंकतील त्यांचे अभिनंदन आणि जे हरतील त्यांना अनुभव मिळेल असे सांगून त्यांनी या महोत्सवातील सर्व सहभागी खेळाडूंचे अभिनंदन केले.

हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव


 rajesh pande