इंडियन वेल्स टेनिस : आर्यना सबालेन्काचा अंतिम फेरीत प्रवेश
कॅलिफोर्निया, १४ मार्च (हिं.स.) जगातील नंबर वन टेनिसपटू आर्यना सबालेन्काने इंडियन वेल्स मास्टर्स २०२६ च्या महिला एकेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. उपांत्य फेरीत सबालेन्काने १४ व्या मानांकित लिंडा नोस्कोवाला ६-३, ६-४ असे पराभूत करत विजेतेपदाच्या स
आर्यना सबालेन्का


कॅलिफोर्निया, १४ मार्च (हिं.स.) जगातील नंबर वन टेनिसपटू आर्यना सबालेन्काने इंडियन वेल्स मास्टर्स २०२६ च्या महिला एकेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. उपांत्य फेरीत सबालेन्काने १४ व्या मानांकित लिंडा नोस्कोवाला ६-३, ६-४ असे पराभूत करत विजेतेपदाच्या सामन्यात प्रवेश केला. या प्रतिष्ठित स्पर्धेत सबालेन्काचा हा तिसरा अंतिम सामना आहे.

सबालेन्का या हंगामात चांगल्या फॉर्ममध्ये आहे. तिने वर्षातील आपल्या पहिल्या १६ सामन्यांपैकी १५ सामने जिंकले आहेत. तिचा एकमेव पराभव हा ऑस्ट्रेलियन ओपन २०२६ च्या अंतिम फेरीत एलेना रायबाकिना विरुद्ध झाला होता.

सुरुवातीपासूनच सबालेन्काने या सामन्यावर वर्चस्व गाजवले. पहिल्या सेटमध्ये तिने नोस्कोवाची सर्व्हिस मोडित काढत ३-१ अशी आघाडी घेतली आणि नंतर ५-१ अशी आघाडी घेतली. नोस्कोवाने एकदा सबालेन्काची सर्व्हिस भेदत पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला होता. पण अव्वल मानांकित टेनिसपटूने 6-३ ने पहिला सेट जिंकला. दुसऱ्या सेटच्या पहिल्या गेममध्ये सर्व्हिस ब्रेक सबालेन्कासाठी निर्णायक ठरला. २१ वर्षीय नोस्कोवाला पुनरागमन करण्याची संधी होती, पण ती त्याचा फायदा उठवू शकली नाही आणि सबालेन्काने सेट आणि सामना ६-४ असा जिंकला.

सामन्यानंतर सबालेन्का म्हणाली की, तिची सर्व्हिस ही सामन्यातील तिचे सर्वात मोठे शस्त्र आहे. ती म्हणाली, नोस्कोवा एक उत्तम टेनिसपटू आहे. मला माहित होते की जर तिला थोडीशीही संधी मिळाली तर ती त्याचा फायदा घेऊ शकते.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande