रत्नागिरी : मिशन लक्षवेध विभागीय स्पोर्टस एक्सलन्स सेंटरसाठी 24 मार्चपर्यंत मुदत
रत्नागिरी, 13 मार्च, (हिं. स.) : विभागीय स्तरावर स्पोर्टस एक्सलन्स सेंटरमध्ये प्रवेश घेण्यासाठी येत्या २४ मार्चपर्यंत मुदत देण्यात आली आहे. या योजनेनुसार निवड होणाऱ्या खेळाडूंना निवास, भोजन, गणवेश व प्रशिक्षण तज्ज्ञ मार्गदर्शक इत्यादी सुविधा पुरवि
रत्नागिरी : मिशन लक्षवेध विभागीय स्पोर्टस एक्सलन्स सेंटरसाठी 24 मार्चपर्यंत मुदत


रत्नागिरी, 13 मार्च, (हिं. स.) : विभागीय स्तरावर स्पोर्टस एक्सलन्स सेंटरमध्ये प्रवेश घेण्यासाठी येत्या २४ मार्चपर्यंत मुदत देण्यात आली आहे.

या योजनेनुसार निवड होणाऱ्या खेळाडूंना निवास, भोजन, गणवेश व प्रशिक्षण तज्ज्ञ मार्गदर्शक इत्यादी सुविधा पुरविण्यात येणार आहेत. यावरील खर्च शासनाद्वारे करण्यात येणार आहे. अर्हताधारक खेळाडूंनी अर्ज 24 मार्चपर्यंत विभागीय उपसंचालक क्रीडा व युवक सेवा, छत्रपती संभाजी महाराज स्टेडियम रेसकोर्स नाका, संभाजी नगर, कोल्हापूर येथे प्रत्यक्ष अथवा dvediop@gmail.com या ई-मेलवर सादर करावेत, असे आवाहन विभागीय उपसंचालक सुहास पाटील यांनी केले आहे.

क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य व विभागीय उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा कोल्हापूर विभाग यांच्याद्वारे प्रथम टप्यात मिशन लक्षवेध अंतर्गत कोल्हापूर येथे शूटिंग व कुस्ती व सांगली येथे रोईंग अशा खेळांचे विभागीय स्तरावर स्पोर्टस एक्सलन्स सेंटर सुरू करण्यात येणार आहे. प्रत्येक खेळासाठी 20 खेळाडूंची निवड करण्यात येणार असून, यासाठी राज्यस्तरावर प्रावीण्यप्राप्त व राष्ट्रीय स्तरावरील सहभागी खेळाडू तसेच 31 डिसेंबर 2026 रोजी वय 25 वर्षांच्या आतील असणे आवश्यक आहे. किमान अर्हतेनुसार मागील 2 वर्षांतील कामगिरीचे मूल्यमापन करण्यात येईल. तसेच क्रीडा कौशल्य व शारीरिक क्षमता चाचण्या घेऊन प्रशिक्षणार्थींची निवड अंतिम करण्यात येणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande