नाशिक - बारदान अपहारप्रकरणी गुन्हा दाखल
नाशिक, 5 फेब्रुवारी, (हिं.स.)। धान खरेदीसाठी शेतकऱ्यांना बारदान न मिळाल्याप्रकरणी आदिवासी विकास महामंडळाकडे काही शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या होत्या. तक्रारींच्या चौकशीअंती जिल्ह्यांतर्गत शहापूर प्रादेशिक कार्यालयातील कर्मचारी पदनाम प्रतवारीकार दोषी आढ
नाशिक - बारदान अपहारप्रकरणी गुन्हा दाखल


नाशिक, 5 फेब्रुवारी, (हिं.स.)। धान खरेदीसाठी शेतकऱ्यांना बारदान न मिळाल्याप्रकरणी आदिवासी विकास महामंडळाकडे काही शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या होत्या. तक्रारींच्या चौकशीअंती जिल्ह्यांतर्गत शहापूर प्रादेशिक कार्यालयातील कर्मचारी पदनाम प्रतवारीकार दोषी आढळले आहेत. त्यामध्ये तब्बल २५ लाख रुपयांचा गैरव्यवहार केल्याचे निष्पन्न झाले आहे.

आदिवासी विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक लीना बनसोड यांच्या निर्देशानुसार संबंधित प्रतवारीकार याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात ज्या उपप्रादेशिक कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे, त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. आदिवासी विकास महामंडळामार्फत दरवर्षी खरेदी केली जाते.

---------------

हिंदुस्थान समाचार / CHANDRASHEKHAR SUKHDEV GOSAVI


 rajesh pande