जळगाव, 5 फेब्रुवारी, (हिं.स.) - जळगाव शहरातील छत्रपती संभाजीनगर येथील रहिवासी असलेल्या महाविद्यालयीन तरुणीने राहत्या घरी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघड झाली. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
विशाखा गौतम सोनवणे (वय १९, रा. छ. संभाजीनगर, जळगाव) असे मयत तरुणीचे नाव आहे. ती आई, वडील, १ भाऊ, १ बहीण यांच्यासोबत वास्तव्यास होती. आयएमआर महाविद्यालयात ती शिक्षण घेत होती. सोमवार दि. ३ फेब्रुवारी रोजी विशाखा हि संध्याकाळी घरी होती. तिची आई वरच्या मजल्यावर असताना विशाखाने घराच्या खोलीत छताला गळफास लावून घेत आत्महत्या केली.
दरम्यान नातेवाईकांनी विशाखाला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला मृत घोषित केले. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. यावेळी नातेवाईकांसह मित्र परिवारात हळहळ व्यक्त होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर