महाकुंभात केली देशाच्याकल्याणाची प्रार्थना- पंतप्रधान
नवी दिल्ली, 05 फेब्रुवारी (हिं.स.) : उत्तरप्रदेशच्या प्रयागराजमध्ये आयोजित महाकुंभमेळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आज बुधवारी त्रिवेणी संगमावर स्नान आणि पूजा केली. यावेळी देशवासियांच्या कल्याणासाठी प्रार्थना केल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. सोशल मिडीया
महाकुंभात स्नान करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी


नवी दिल्ली, 05 फेब्रुवारी (हिं.स.) : उत्तरप्रदेशच्या प्रयागराजमध्ये आयोजित महाकुंभमेळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आज बुधवारी त्रिवेणी संगमावर स्नान आणि पूजा केली. यावेळी देशवासियांच्या कल्याणासाठी प्रार्थना केल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. सोशल मिडीया प्लॅटफॉर्म ट्विटरवर (एक्स) केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी ही माहिती दिली.

यासंदर्भातील पोस्टमध्ये पंतप्रधान म्हणाले की, आज महाकुंभात प्रयागराज येथील पवित्र संगमात स्नान केल्यानंतर पूजा करण्याचे परम भाग्य लाभले. मां गंगेचा आशीर्वाद मिळाल्याने मनाला अपार शांती आणि समाधान मिळाले. यावेळी सर्व देशवासीयांच्या सुख, समृद्धी, आरोग्य आणि कल्याणासाठी प्रार्थना केल्याचे मोदी म्हणाले. प्रयागराजच्या दिव्य- भव्य महाकुंभात श्रद्धा, भक्ती आणि अध्यात्माचा संगम कोणालाही भारावून टाकणारा आहे, असे सांगत पीएम मोदी यांनी पवित्र कुंभमेळ्यातील स्नानाचे काही फोटो शेअर केले आहेत.

पंतप्रधान मोदी यांनी यांनी भारताची जीवनरेखा, अध्यात्म आणि संस्कृतीचा सनातन स्रोत असलेल्या माँ गंगेची विधीवत पूजा केली आणि देशवासीयांच्या सुख, शांती आणि समृद्धीसाठी प्रार्थना केली.'' असे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे पंतप्रधान मोदी महाकुंभमेळ्यात सहभागी झाल्याने कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती. काही दिवसांपूर्वीच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाकुंभमेळ्यात सहभागी झाले होते. त्यांनी संगमात पवित्र स्नान करुन पूजा केली होती. उत्तर प्रदेश सरकारने दिलेल्या माहितीनुसार, 13 जानेवारीपासून सुरु झालेल्या या महाकुंभमेळ्यात 4 फेब्रुवारीपर्यंत 38.29 कोटी भाविकांनी संगमात पवित्र स्नान केले आहे.

--------------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande