जळगाव - अपघात प्रकरणी एसटी चालकाला एक वर्ष कारावासाची शिक्षा
जळगांव, 11 मार्च (हिं.स.) भरधाव वेगाने एसटी बस चालवून अपघात घडविल्याप्रकरणी मच्छिद्र मधुकर देवरे (रा. हिरापूर, ता. चाळीसगाव) यांना चाळीसगाव न्यायालयाने एक वर्ष कारावास आणि ६ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास अतिरिक्त सहा महिने तुरुंगवास
जळगाव - अपघात प्रकरणी एसटी चालकाला एक वर्ष कारावासाची शिक्षा


जळगांव, 11 मार्च (हिं.स.) भरधाव वेगाने एसटी बस चालवून अपघात घडविल्याप्रकरणी मच्छिद्र मधुकर देवरे (रा. हिरापूर, ता. चाळीसगाव) यांना चाळीसगाव न्यायालयाने एक वर्ष कारावास आणि ६ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास अतिरिक्त सहा महिने तुरुंगवास भोगावा लागेल, असा निर्णय न्यायालयाने दिला. करगाव येथे झालेल्या या दुर्दैवी अपघातात एक मोटारसायकलस्वार जागीच ठार झाला होता. या प्रकरणात चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याच्या वतीने न्यायालयात फौजदारी खटला दाखल करण्यात आला. खटल्याच्या सुनावणीत सरकार पक्षातर्फे सात साक्षीदार तपासण्यात आले.

फिर्यादी व साक्षीदारांनी दिलेल्या महत्त्वपूर्ण साक्षींच्या आधारे आरोपीने निष्काळजीपणे व भरधाव वेगाने एसटी बस चालवून अपघात घडवल्याचे न्यायालयात सिद्ध झाले. या प्रकरणात न्यायदंडाधिकारी एस. डी. यादव यांनी आरोपीला दोषी ठरवत एक वर्ष तुरुंगवास आणि ६ हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली.या खटल्यात सहाय्यक सरकारी अभियोक्ता रमेश माने यांनी प्रभावी युक्तिवाद सादर केला. तसेच सहाय्यक सरकारी अभियोक्ता शशिकांत माने, मनोज विजय माने आणि चेतना पी. कलाल यांनी खटल्यात सहकार्य केले .

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande