नगर - महानगपालिकेचा सन २०२५-२६ चा अर्थसंकल्प १६८० कोटींचा
अहिल्यानगर दि. 12 मार्च (हिं.स.) :- अहिल्यानगर महानगपालिकेचे लोकनियुक्त सदस्य यांची मुदत संपून सव्वा वर्ष झाले आहे. प्रशासन काळातील दुसरे आयुक्त तथा प्रशासक म्हणून म्हणून माझी शासनाने नेमणूक केली. त्यामुळे अहिल्यानगर महानगरपालिकेचा सन २०२५-२६ अर्थसंक
महानगपालिकेचा सन २०२५-२६ चा अर्थसंकल्प १६८० कोटींचा

अहिल्यानगर दि. 12 मार्च (हिं.स.) :- अहिल्यानगर महानगपालिकेचे लोकनियुक्त सदस्य यांची मुदत संपून सव्वा वर्ष झाले आहे. प्रशासन काळातील दुसरे आयुक्त तथा प्रशासक म्हणून म्हणून माझी शासनाने नेमणूक केली. त्यामुळे अहिल्यानगर महानगरपालिकेचा सन २०२५-२६ अर्थसंकल्प मांडण्याची संधी मिळाली. महानगपालिकेचा सन २०२५-२६ चा अर्थसंकल्प सादर करत असून एकुण १६८० कोटी रुपयांचा अर्थसंकल्प असून तो प्रशासकीय स्थायी समितीत सादर करत आहे,असे प्रतिपादन महा नगरपालिका आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी केले.

महानगरपालिका अंदाजपत्रकात महसुली उत्पन्न रु. ४५२ कोटी ०३ लाख, भांडवली जमा रु. ११५९ कोटी ०५ लाख अंदाजित आहे. महसुली उत्पन्नात संकलीत करापोटी रु. १०३ कोटी ८० लाख, संकलीत करावर आधारीत करापोटी ५८ कोटी ७० लाख, जी एस टी अनुदान १४० कोटी ६७ लाख व इतर महसुली अनुदान रु. १८ ोटी, गाळा भाडे ३ कोटी ८२ लाख, पाणीपट्टी ३० कोटी लाख, मिटरद्वारे पाणी पुरवठापोटी १० कोटी, संकीर्णे ३० कोटी इ. महत्वाच्या आहेत. तसेच विविध शासकीय निधी मोठ्या प्रमाणत मिळणार असल्याने शहर विकासासाठी त्याचा मोठा हातभार लागणार आहे.

खर्च बाजूस वेतन, भत्ते व मानधनावर १७० कोटी ६४ लाख, पेन्शन ५४ कोटी, पाणी पुरवठा विज बिल ४० कोटी, स्ट्रीट लाईट विज बिल ८ कोटी, शिक्षण विभाग वेतन हिस्सा व इतर खर्च हिस्सा ६ कोटी, महिला व बाल कल्याण योजना ३ कोटी २५ लाख, अपंग पुनर्वसन योजना ३ कोटी २५ लाख, मागासवर्गीय कल्याणकारी योजना ८ कोटी ४१ लाख, औषधे व उपकरणे १ कोटी ७० लाख, कचरा संकलन व वाहतूक १८ कोटी, पाणी पुरवठा साहित्य खरेदी व दुरुस्ती १ कोटी, टँकरद्वारे पाणी पुरवठा व तुरटी, ब्लिचिंग पावडर खरेदी २ कोटी ७५ लाख, अशुध्द पाणी आकार ४ कोटी, विविध वाहने खरेदी ३ कोटी, नविन रस्ते ३०० कोटी, रस्ते दुरुस्ती ३ कोटी, इमारत दुरुस्ती ५५ लाख, शहरातील ओढ नाले साफसफाई ५५ लाख, आपत्कालीन व्यवस्थापन ५० लाख, कोडवाड्यावरील खर्च १२ लाख, वृक्षारोपण तदनुषंगिक खर्च १ कोटी, हिवताप प्रतिबंधक योजना ६० लाख, कचरा डेपो सुधारणा व प्रकल्प उभारणी १ कोटी १६ लाख, मोकाट कुत्री व जनावरे बंदोबस्त ९५ लाख, मालमत्ता सर्वेक्षण १० कोटी, मृत जनावरे विल्हेवाट प्रकल्प ३५ लाख, पुतळे बसविणे २ कोटी, भविष्य निर्वाह निधी तूट २ कोटी ५० लाख, बेवारस प्रेत विल्हेवाट ४० लाख, उद्यान दुरुस्ती २५ लाख यासह इतर बाबींबर खर्च अपेक्षीत आहे.

अहिल्यानगर महानगरपालिकेचा सन २०२४-२०२५ चा सुधारीत व सन २०२५-२०२६ चा मुळ अर्थसंकल्पीय अंदाज महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी मंजूर केला.

मुख्य व लेखा वित्त अधिकारी श्री. सचिन धस यांनी उपायुक्त डॉ. विजयकुमार मुंढे, सहायक आयुक्त श्री. निखील फराटे, सपना वसावा, प्रियंका शिंदे, नगरसचिव मेहेर लहारे, शहर अभियंता श्री. मनोज पारखे, जल अभियंता परिमल निकम, लेखा विभागाचे अनिल लोंढे तसेच इतर विभाग प्रमुख यांच्या उपस्थितीत अंदाजपत्रकाची प्रत महापालिका आयुक्तांकडे मा. प्रशासकीय स्थायी समितीत सादर केली.

जमा व खर्चाचे अंदाज आरंभिची शिल्लक रु. ३६५.१० लक्ष व जमा १६७६३१.७८ लक्ष अशी मिळून एकत्रित जमा १६७९९६.८८ लक्ष आणि खर्च रु. १६७६५०.८१ व शिल्लक रु. ३४६.०७ लक्षचे महानगरपालिकेचे सन २०२५-२०२६ चे मुळ अंर्थसंकल्पीय अंदाज मंजूर करण्यात आले.

खर्च बाजूस वेतन, भत्ते व मानधनावर १७० कोटी ६४ लाख, पेन्शन ५४ कोटी, पाणी पुरवठा विज बिल ४० कोटी, स्ट्रीट लाईट विज बिल ८ कोटी, शिक्षण विभाग वेतन हिस्सा व इतर खर्च हिस्सा ६ कोटी, महिला व बाल कल्याण योजना ३ कोटी २५ लाख, अपंग पुनर्वसन योजना ३ कोटी २५ लाख, मागासवर्गीय कल्याणकारी योजना ८ कोटी ४१ लाख, औषधे व उपकरणे १ कोटी ७० लाख, कचरा संकलन व वाहतूक १८ कोटी, पाणी पुरवठा साहित्य खरेदी व दुरुस्ती १ कोटी, टँकरद्वारे पाणी पुरवठा व तुरटी, ब्लिचिंग पावडर खरेदी २ कोटी ७५ लाख, अशुध्द पाणी आकार ४ कोटी, विविध वाहने खरेदी ३ कोटी, नविन रस्ते ३०० कोटी, रस्ते दुरुस्ती ३ कोटी, इमारत दुरुस्ती ५५ लाख, शहरातील ओढ नाले साफसफाई ५५ लाख, आपत्कालीन व्यवस्थापन ५० लाख, कोडवाड्यावरील खर्च १२ लाख, वृक्षारोपण तदनुषंगिक खर्च १ कोटी, हिवताप प्रतिबंधक योजना ६० लाख, कचरा डेपो सुधारणा व प्रकल्प उभारणी १ कोटी १६ लाख, मोकाट कुत्री व जनावरे बंदोबस्त ९५ लाख, मालमत्ता सर्वेक्षण १० कोटी, मृत जनावरे विल्हेवाट प्रकल्प ३५ लाख, पुतळे बसविणे २ कोटी, भविष्य निर्वाह निधी तूट २ कोटी ५० लाख, बेवारस प्रेत विल्हेवाट ४० लाख, उद्यान दुरुस्ती २५ लाख यासह इतर बाबींबर खर्च अपेक्षीत आहे.

महापालिका आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांचे अर्थसंकल्पीय निवेदन 'माझे शहर सुंदर शहर' मानणा-या अहिल्यानगर नागरिकांचा, नागरिकांकरीता असलेला सन २०२५-२६ चा अर्थसंकल्प सादर करताना मला अतिशय आनंद होत आहे. अहिल्यानगर महानगरपालिकेस सलग दुस-या वर्षी शासनाकडून माझी वसुंधरा अंतर्गत स्वच्छता विषय देण्यात द्वितीय क्रमांचाचा पुरस्कार रु. ६ कोटी प्राप्त झाला. त्याचाही सर्वस्वी श्रेय नगरकरांचे असून त्याचा मला त्याचा अभिमान आहे. त्यामुळे हा मिळालेला बहुमान टिकविण्याची आपली जबाबदारी आणखी वाढली आहे.

हिंदुस्थान समाचार / Shirish Kulkarni

 rajesh pande