नगर - प्रा.जवाहर मुथा यांचे कार्य कर्तृत्व कायम भूषणावह - संतोष गांधी
अहिल्यानगर दि. 12 मार्च (हिं.स.) :- नगरच्या नवीपेठ परिसराला अनेक नामवंत समाजधुरीणांची परंपरा आहे. या परिसरात वास्तव्य करणाऱ्या अनेकांनी विविध क्षेत्रात कर्तृत्व गाजवले आहे. यातीलच प्रमुख नाव म्हणजे प्रा. जवाहर मुथा. सामाजिक, धार्मिक, साहित्य, राजकीय,
प्रा.जवाहर मुथा यांचे कार्य कर्तृत्व कायम भूषणावह


अहिल्यानगर दि. 12 मार्च (हिं.स.) :- नगरच्या नवीपेठ परिसराला अनेक नामवंत समाजधुरीणांची परंपरा आहे. या परिसरात वास्तव्य करणाऱ्या अनेकांनी विविध क्षेत्रात कर्तृत्व गाजवले आहे. यातीलच प्रमुख नाव म्हणजे प्रा. जवाहर मुथा. सामाजिक, धार्मिक, साहित्य, राजकीय, पत्रकारिता अशा अनेक क्षेत्रात त्यांनी अतुलनीय योगदान दिले आहे. जैन धर्म तत्त्वज्ञानाचा त्यांना गाढा अभ्यास आहे. साधू संतांशी त्यांचा नेहमीच चर्चात्मक संवाद होत असतो. सान्निध्यात येणाऱ्या नव्या पिढीला ते नेहमी सकारात्मक विचार देऊन मार्गदर्शन करतात. चांगले काम करणार्‍याच्या पाठीवर शाबासकीची थाप मारुन प्रोत्साहन देतात.तरूणां शी मित्रत्वाच्या नात्याने संवाद साधून सर्वांना आपलेसे करून घेतात. त्यांच्या साहित्यावर सारडा कॉलेजमधील प्रा.राजू रिक्कल यांनी पुणे विद्यापीठात पीएचडी केली आहे. साहित्यक्षेत्रात नगरचे नाव कायम झळकावण्याचे काम त्यांनी केले आहे.ते खऱ्या अर्थाने नवीपेठेसाठी भूषणा वह ज्येष्ठ व्यक्तीमत्व आहेत, असे प्रतिपादन सहकारमहर्षी सुवालालजी गुंदेचा जैन ओसवाल पतसंस्थेचे माजी चेअरमन संतोष गांधी यांनी केले.

ज्येष्ठ साहित्यिक प्रा.जवाहर मुथा यांच्या 85 व्या वाढदिवसानिमित्त नवीपेठ मित्र परिवारातर्फे त्यांचा सत्कार व अभिष्टचिंतन करण्यात आले. यावेळी आनंद मुथा, संजय ओस्तवाल, श्यामला मुथा उपस्थित होते.आनंद मुथा म्हणाले की, वयाच्या 85 व्या वर्षीही प्रा.जवाहर मुथा यांचा उत्साह दांडगा असून समाजासाठी सतत काही तरी करण्याची त्यांची धडपड असते. नवीपेठ परिसरातील तरूणांचे ते हक्काचे मार्गदर्शक आहे. साहित्य, सामाजिक क्षेत्रात काम करताना ते नेहमी युवा पिढीला समाजाप्रती दायित्त्व ठेवण्याचा सल्ला देतात. त्यांना निरोगी दीर्घायुष्य लाभावे‌ याच शुभेच्छा.

प्रा.जवाहर मुथा म्हणाले की, नवी पेठ परिसरातील युवक नेहमीच विधायक उपक्रम राबविण्यात अग्रेसर असतात. त्यांच्या सहवासात मलाही तरूण झाल्यासारखे वाटते. अतिशय प्रगल्भ काम करणारी ही मंडळी आजूबाजूला असणे हे नेहमीच आनंददायी असते. त्यांनी वाढदिवसानिमित्त दिलेल्या शुभेच्छा मोठा आनंद देणार्‍या आहेत.

हिंदुस्थान समाचार / Shirish Kulkarni


 rajesh pande