नगर - जगद्गुरु संत तुकाराम महाराज बीजे निमित्त अखंड हरिनाम सप्ताह व गाथा पारायण सोहळा
अहिल्यानगर दि. 12 मार्च (हिं.स.) :- परमार्थ करत असताना विचाराने करा सोंगां-ढोगांने करू नका. विचारांची कृती अंगीकारून समाजामध्ये वावरावे, राजमाता जिजाऊ यांचे विचार अंगीकारून पुढच्या पिढीला देण्याचे काम करावे त्या माध्यमातून सुसंस्कृत पिढी निर्माण होई
जगद्गुरु संत तुकाराम महाराज बीजे निमित्त अखंड हरिनाम सप्ताह व गाथा पारायण सोहळा


अहिल्यानगर दि. 12 मार्च (हिं.स.) :- परमार्थ करत असताना विचाराने करा सोंगां-ढोगांने करू नका. विचारांची कृती अंगीकारून समाजामध्ये वावरावे, राजमाता जिजाऊ यांचे विचार अंगीकारून पुढच्या पिढीला देण्याचे काम करावे त्या माध्यमातून सुसंस्कृत पिढी निर्माण होईल. संतांचे विचार दिशादर्शक प्रेरणा व ऊर्जा देणारे आहेत आपल्या घरामध्ये किती प्रगल्भता आहे याकडे लक्ष द्या. याचबरोबर विचाराचे केंद्र देखील निर्माण करा अशी प्रतिपादन ह.भ.प ज्ञानेश्वर महाराज तांबे यांनी केले.

सावेडी गाव येथे जगद्गुरु संत तुकाराम महाराज बीजे निमित्त अखंड हरिनाम सप्ताह व गाथा पारायण सोहळ्या मध्ये ह.भ.प ज्ञानेश्वर महाराज तांबे यांचे कीर्तन संपन्न झाले. यावेळी माजी महापौर बाबासाहेब वाकळे, राजाभाऊ मुळे, अशोक वाकळे, ह.भ.प संदीप महाराज खोसे, ह.भ.प श्रीराम अनारसे, संजय सुराणा, भीमाशंकर लांडे, आंप्पा बेंद्रे, रामदास हिंगे, गणपत हिंगे आदीसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सावेडी गावामध्ये सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या तिसऱ्या दिवशी ह.भ.प ज्ञानेश्वर महाराज तांबे यांनी आपल्या खास शैलीत कीर्तनाच्या माध्यमातून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. मनुष्याच्या शरीरातील वाईट विचार गेल्यानंतर सृष्टी आनंदी होत असते, आणि आनंदीमय सृष्टीला अनेकांना आनंद वाटता येतो,असे मत संदीप महाराज खोसे यांनी व्यक्त केले.

हिंदुस्थान समाचार / Shirish Kulkarni


 rajesh pande