सोलापूर, 12 मार्च (हिं.स.)।
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती सोलापूर शहर शाखेच्या वतीने गुरूवारी होळी सणानिमित्त ‘होळी करा लहान, पोळी करा दान’ हा उपक्रम राबवित आहे. या उपक्रमाबद्दल महिती देताना अंनिस शहर शाखा कार्याध्यक्ष डॉ अस्मिता बालगावकर यांनी सांगितले की, भारतात दर वर्षी होळीला कमीत कमी २८ हजार क्विंटल लाकडे जाळली जातात. लाकडांची किंमत कोट्यवधींच्या घरात असते.
यामुळे आपली राष्ट्रीय संपत्ती आणि ऊर्जा साधने खूप मोठ्या प्रमाणात वाया जातात. इतकेच नव्हे तर त्यामुळे खूप मोठे वायू प्रदूषण होते. म्हणून आपण होळी अगदी छोटीशी आणि सुकी लाकडे व झाडांचा वाळलेला पाला पाचोळा वापरून करावी. होळीत नैवेद्य म्हणून पुरणपोळी टाकण्यापेक्षा गरिबीमुळे उपाशीपोटी जगणाऱ्यांना पुरणपोळी दान करणे जास्त हितकारक आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड