सोलापूर, 12 मार्च (हिं.स.)।तात्काळ बुद्धगया येथील महाबोधी महाविहार मुक्त करण्यात यावे, बुद्धगया येथील महाबोधी महाविहार 1949 चा व्यवस्थापन ऍक्ट मध्ये तात्काळ दुरुस्ती करून महाबोधी महाविहाराचे संपूर्ण व्यवस्थापन हे बौद्धांच्या हाती देण्यात यावे, बुद्धगया महाबोधी महाविहार येथे सुरू असलेल्या महाबोधी महाविहार मुक्ती
आंदोलनातील सर्व मागण्या त्वरित मंजूर करण्यात याव्यात, जगभरातील व देशातील सर्व बौद्ध बांधवांच्या भावनेचा विचार व आदर करून 1949 च्या व्यवस्थापन ऍक्ट दुरुस्ती करावी या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी सोलापूर शहरात वंचित बहुजन आघाडी व भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने मोठा मोर्चा काढण्यात आला.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड