सोलापूर, 12 मार्च (हिं.स.) : प्रादेशिक परिवहन कार्यालय सोलापूर विभागाच्या वायुवेग पथकामार्फत अटकाविण्यात आलेल्या 45 वाहनांच्या वाहनधारकांनी दि. 8 एप्रिल 2025 पूर्वी वसूली योग्य असलेली रक्कम प्रादेशिक परिवहन अधिकारी सुंदरम नगर विजापूर रोड ,सोलापूर यांचे कडे भरण्यात यावी, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी,विजय पाटील यांनी केले आहे. रक्कम भरण्यात आली नाही तर सोडवून न नेलेल्या वाहनांची ई लिलावाद्वारे 9 एप्रिल 2025 रोजी विकण्यात येतील. ई लिलावाच्या नंतर थकबाकीदारास वाहन कर भरण्याचा तसेच मालकी हक्काचा अधिकारी राहणार नाही . सदर वाहने विक्री कायम होण्यास अधीन राहिल. अधिक माहिती प्रादेशिक परिवहन कार्यालय सोलापूर येथील सूचना फलकावर लावण्यात आली आहे.असेही उप प्रादेशिक परिवहन अधिकारी,विजय पाटील यांनी कळविले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड