रवींद्र धंगेकर शिवसेनेत दाखल मात्र भाजपची नाराजी
पुणे, 12 मार्च (हिं.स.)। कसब्यातील काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी सोमवारी माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. धंगेकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला असला, तरी त्यांच्या प्रवेशामुळे भाजपच्या कसबा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यां
रवींद्र धंगेकर शिवसेनेत दाखल मात्र भाजपची नाराजी


पुणे, 12 मार्च (हिं.स.)। कसब्यातील काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी सोमवारी माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. धंगेकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला असला, तरी त्यांच्या प्रवेशामुळे भाजपच्या कसबा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांनी या प्रवेशाबाबत नाराजी व्यक्त केली आहे.

२०१७च्या पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत धंगेकर यांनी माजी आमदार मोहन जोशी यांच्या आग्रहास्तव काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. त्यानंतर कसब्यात झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकीत धंगेकर यांनी विजय संपादन केला होता.

वर्षभरापूर्वी पुणे शहर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक धंगेकर यांनी काँग्रेसकडून लढविली होती. त्यात ते पराभूत झाले होते. त्यांनी नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत कसबा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्यातही ‘ते पराभूत झाले होते. तेव्हापासून ते नाराज होते. त्यांनी पक्षप्रवेशाबाबत शिंदे यांच्याकडे संपर्क साधला होता. त्यानुसार त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. धंगेकर यांचा हा चौथा पक्षप्रवेश आहे. ते शिवसेनेत आल्याने कसबा भाजपाची गोची झाली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande