चंद्रपूर : तळोधी वनपरिक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात गावकऱ्याचा मृत्यू
चंद्रपूर, 15 एप्रिल (हिं.स.)। नागभीड तालुक्यातील तळोधी वनपरिक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात मोहफुले संकलनासाठी गेलेल्या गावकऱ्यावर वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली. तळोधी वनपरिक्षेत्रात मारोती बोरकर (६५) हा गावकरी मोहफुले संकलना
चंद्रपूर : तळोधी वनपरिक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात गावकऱ्याचा मृत्यू


चंद्रपूर, 15 एप्रिल (हिं.स.)।

नागभीड तालुक्यातील तळोधी वनपरिक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात मोहफुले संकलनासाठी गेलेल्या गावकऱ्यावर वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली.

तळोधी वनपरिक्षेत्रात मारोती बोरकर (६५) हा गावकरी मोहफुले संकलनासाठी गेला असता वाघाने त्याच्यावर गंगासागर हेटी नियतक्षेत्रातील कक्ष क्रमांक ९० मध्ये हल्ला करून जागीच ठार केले. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी तातडीने दाखल झाले. दरम्यान परिसरात गस्त वाढवण्यात आलेली असून सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव


 rajesh pande