आंदोलनातून काँग्रेस कार्यकर्त्यांनी सक्रिय राहावे - मोहन जोशी
सोलापूर, 16 एप्रिल (हिं.स.)। येणारा काळ आपलाच आहे. महायुती सरकार विरोधात प्रचंड रोष आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी आंदोलनातून काँग्रेस कार्यकर्त्यांनी सक्रिय रहावे, असे आव्हान काँग्रेसचे निरीक्षक मोहन जोशी यांनी केले. महाराष्ट्
आंदोलनातून काँग्रेस कार्यकर्त्यांनी सक्रिय राहावे - मोहन जोशी


सोलापूर, 16 एप्रिल (हिं.स.)।

येणारा काळ आपलाच आहे. महायुती सरकार विरोधात प्रचंड रोष आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी आंदोलनातून काँग्रेस कार्यकर्त्यांनी सक्रिय रहावे, असे आव्हान काँग्रेसचे निरीक्षक मोहन जोशी यांनी केले.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष तथा काँग्रेसचे निरिक्षक मोहन जोशी यांच्या अध्यक्षतेखाली शहर काँग्रेस कमिटीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची संघटनात्मक आढावा बैठक काँग्रेस भवन सोलापूर येथे झाली. त्यावेळी निरीक्षक जोशी यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले.

यावेळी शहराध्यक्ष चेतन नरोटे, संजय हेमगड्डी, आरिफ शेख, सुशिला आबुटे, अलका राठोड, शिवा बाटलीवाला, प्रवीण निकाळजे, विनोद भोसले, परवीन इनामदार, फिरदौस पटेल, भारती ईप्पलपल्ली, अनुराधा काटकर, प्रमिला तुपलवंडे, सुनील रसाळे, शकील मौलवी, नरसिंह आसादे यांची प्रमुख उपस्थिती होती.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande