सोलापूर, 16 एप्रिल (हिं.स.)। मोहोळ शहरातील मुख्य रस बंद असलेले तसेच रस्त्याच्या कडेला वाहतुकीस अडथळा असणारे पोल काढण्यात यावेत, वाहनधारकांना उड्डानपुलाखाली पार्किंग व्यवस्था करण्यात यावी तसेच मोहोळ-वैराग रस्ता अधिग्रहण करुन त्याचा मोबदला शेतकर्यांना मिळावा, तालुक्यातील शेतकर्यांना रोजगार हमी योजनेतून विहिरींना मंजुरी मिळावी आदी मागण्यांचे निवेदन उद्धव ठाकरे शिवसेनेच्या वतीने तहसीलदार व मुख्याधिकार्यांना देण्यात आले.
मुख्याधिकारी डॉ. योगेश डोके यांना देण्यात आलेल्या निवेदनात, शहरातील नागरिकांना येवती पाणी पुरवठा व भुमिगत गटारीच्या कामामुळे खांदलेल्या खड्ड्यांचा त्रास सहन करावा लागत आहे, अनेक ठिकाणी चेंबर उघडे आहेत. त्याठिकाणी अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सदर कामे लवकर पूर्ण करण्यात यावी. शहरातील मेन रोडवर मध्यभागी बंद व रस्त्यालगत असलेले पोल अडथळा ठरत आहेत ते लवकर काढावेत. उड्डानपुलाखाली असणार्या मोकळ्या जागेत पार्किंगची व्यवस्था करण्यात यावी. मोहोळ शहरात यात्रा काळात पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्याची दक्षता घ्यावी आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.
-------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड