नाशिक, 16 एप्रिल (हिं.स.)।
- उबाठा शिवसेनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या निर्धार शिबिराला मिळालेला अत्यल्प प्रतिसादामुळे हा निर्धार मेळावा फसला आहे. त्यामुळे शिवसैनिकांमध्ये चलबिचल वातावरण अजून वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
शिवसेने उबाठाच्या वतीने नासिक मध्ये बुधवारी निर्धार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हे शिबिर राज्यव्यपी पदाधिकाऱ्यांसाठी आयोजित करण्यात आले होते. त्यामुळे या शिबिराचा गाजावाजा करताना मोठ्या प्रमाणावरती होर्डिंग लावण्यात आले तसेच वेगवेगळ्या पद्धतीप्रमाणे देखील मोठ्या प्रमाणात करण्यात आला परंतु त्या तुलनेमध्ये शिबिराला पदाधिकारी आणि शिवसैनिकांचा जो प्रतिसाद पाहिजे तसा अपेक्षित होता तो प्रतिसाद मात्र मिळू शकला नाही. हे शिबिर सकाळी साडेनऊ वाजता सुरू होणार होते परंतु तब्बल एक तासापेक्षा अधिक वेळ उशिराने हे शिबिर सुरू झाले. कारण नियोजित वेळेवर ती पदाधिकारी नाशिक मध्ये पोहोचू शकले नाही. कडक उन्हाचा फटका देखील या शिबिराला बसला आहे.त्यामुळे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था किंवा अन्य निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शिवसैनिकांना एकसंघ ठेवून जे काम करण्याचा उदातहेतू उबाठा शिवसेनेच्या वतीने करण्यात आला होता तो बघितला तर हेतू जरी लाख चांगला असला तरी शिवसैनिक तसेच पदाधिकाऱ्यांमध्ये असलेली चलबिचल चे वातावरण मात्र शांत होण्याचे नाव घेत नाही.
उबाठाचे निर्धार शिबिर हे इतर पदाधिकाऱ्यांना काहीतरी निर्धार करून पुढे जाण्याचा मार्ग मिळेल अशी अपेक्षा होती परंतु या ठिकाणी काही पदाधिकाऱ्यांनी शिवसेना का सोडली नाही शिवसेनेत का राहावंसं वाटतं यासारख्या विषयांवर चर्चा करून जो मार्ग निर्धार मेळाव्यात दिसणं अपेक्षित होतं तो मात्र कुठेही दिसला नाही . त्यामुळे या निर्धार शिबिरातून जी पुढील ध्येयधोरण अपेक्षित होती ती मात्र होताना दिसली नाही. हे या निर्धार शिबिराला मिळालेल्या प्रतिसादावरून दिसून येत आहे ज्या पद्धतीप्रमाणे शिबिर यशस्वी करणे आवश्यक होते ते मात्र यशस्वी होऊ शकले नाही हेच या निर्धार शिबिराचे फलित म्हणावे लागणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / CHANDRASHEKHAR SUKHDEV GOSAVI