नाशिक, 15 एप्रिल (हिं.स.)। एका बाजूला आज पक्ष बळकटी करण्यासाठी म्हणून उबाठा शिवसेनेचे उत्तर महाराष्ट्र संमेलन हे नाशिक मध्ये होत आहे तर दुसऱ्या बाजूला उबाठा शिवसेना कार्यालयाची अवस्था अतिशय बिकट झाली असून आता कोणत्याही क्षणी या कार्यालयाची वीज कापण्याची तयारी भद्रकाली विद्युत मंडळाच्या वतीने करण्यात आली आहे याच बरोबरीने पक्षाचे कार्यालय हे विविध समस्यांनी घेरले गेले असून यावरती पक्षाचे जिल्हाप्रमुख कोणतेही भाष्य करण्यास तयार नाही. त्यांच्याशी संपर्क साधला असता जिल्हा प्रमुखांनी फोन कट केल्यामुळे त्यांची भूमिका कळू शकली नाही
उबाठा शिवसेनेचे सध्याच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर पडझड होत आहे आणि याला पक्षातीलच काही पदाधिकारी कारणीभूत होत आहे अलीकडच्या काळामध्ये पक्षांमध्ये बदल करण्यात आला आणि नव्याने जिल्हाप्रमुख नियुक्त करण्यात आले परंतु पक्ष आणि पक्षाचे कार्यालय हे मुळातच विविध समस्यांनी घेरले गेलेले आहे त्या समस्या सोडविण्यापेक्षा पक्षाचे जिल्हाप्रमुख त्याकडे दुर्लक्ष करीत असून मोठ्या समस्यांना पक्ष कार्यालय सध्या तोंड देत आहे पक्षाचे राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील नेते हे जनतेच्या प्रश्नावर आपली भूमिका मांडून पक्षाला ताकद देण्याचे काम करत असताना मात्र एकेकाळी शिवसेनेचा गड असलेला नाशिक जिल्हा आणि शहर हे आता अधोगतीकडे चाललेले आहे. विद्युत मंडळाच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पक्षाचेच शालिमार येथील असलेल्या कार्यालयाचे लाईट बिल हे थकले असून ते अलीकडच्या काळामध्ये भरले गेले नाही तर कोणत्याही क्षणी पक्षाच्या कार्यालयाचा वीजपुरवठा खंडित करण्याची तयारी ही विद्युत मंडळाच्या भद्रकाली येथील उपविभागीय कार्यालयाने सुरू केलेली आहे त्याबाबतची कारवाई ही येणार काही दिवसात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे . याच बरोबरीने पक्षाच्या कार्यालयात हार फुले हे मागविले जातात पण त्या हार फुलांचे बिल देण्याची सुद्धा तयारी जिल्हाप्रमुखांनी न दाखविल्याने मागील चार महिन्यापासून हे हार फुले देणारा विक्रेता देखील सातत्याने चकरा मारत आहे पण त्याला पैसे मिळत नाही. पक्षाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काही कर्मचाऱ्यांचे वेतन देखील थकले असून ते देण्यात जिल्हाप्रमुख पूर्णपणे अपयशी ठरल्याचे दिसून येत आहे. यासारख्या अनेक प्रश्नांची समस्या ही या ठिकाणी तयार झालेली आहे परंतु ती समस्या सोडविण्यापेक्षा आणि पक्षाच्या हिताचे राजकारण करण्यापेक्षा पक्ष अधोगतीस कसे जाईल अशा स्वरूपाचे राजकारण जिल्हाप्रमुखांकडून होत असल्याचे चित्र सध्या नाशिक जिल्ह्यामध्ये दिसून येत आहे त्यामुळे बाळासाहेबांची शिवसेना म्हनविणाऱ्या शिवसेनेची इतकी अधोगती झाली आहे की आता या पक्षाच्या पडझळीला पक्ष नेतृत्वाने केलेला बदल देखील सावरू शकत नाही तर येणाऱ्या काळामध्ये होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काय होणार हा मोठा प्रश्नचिन्ह शिवसैनिकांसमोर उभा राहिला आहे या सर्व प्रश्नांवरती सध्या तरी नाशिकमधील शिवसैनिक हे डबक्या आवाजामध्ये चर्चा करीत असले तरी यावरून मात्र शिवसैनिकांमध्ये मोठी नाराजी निर्माण झालेली आहे. या सर्व प्रश्नाबाबत पक्षाचे जिल्हाप्रमुखांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता वारंवार त्यांनी फोन कट केल्यामुळे त्यांची भूमिका ही उपलब्ध होऊ शकली नाही.
---------------
हिंदुस्थान समाचार / CHANDRASHEKHAR SUKHDEV GOSAVI