कोणतीही निवडणूक येऊ द्या तुम्हाला हिसका दाखवतो -राम सातपुते
सोलापूर, 16 एप्रिल (हिं.स.)।चिखलात माखलेला हाल्या लोकसभा निवडणुकीत केवळ अवकाळी पावसाने धुवून निघाला आहे, अशा शब्दात माळशिरसचे माजी आमदार राम सातपुते यांनी माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्यावर टीका केलीये. करमाळा तालुक्यातील आदिनाथ सहकारी
ram satpute


सोलापूर, 16 एप्रिल (हिं.स.)।चिखलात माखलेला हाल्या लोकसभा निवडणुकीत केवळ अवकाळी पावसाने धुवून निघाला आहे, अशा शब्दात माळशिरसचे माजी आमदार राम सातपुते यांनी माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्यावर टीका केलीये. करमाळा तालुक्यातील आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत प्रचाराच्या शेवटच्या दिवशी झालेल्या भाषणात सातपुते यांनी मोहिते पाटलांवर भाष्य केलंय. काही दिवसांपूर्वीच राम सातपुते यांनी धैर्यशील मोहिते पाटलांना लक्ष्य केलं होतं. एका रिंगवर देवेंद्र फडणवीस साहेब माझा फोन उचलतात, कोणतीही निवडणूक येऊद्या. मी तुम्हाला हिसका दाखवतो, अशी टीकाही राम सातपुते यांनी केली होती. राम सातपुते यांना लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला होता. यामध्ये मोहिते पाटलांची भूमिका महत्त्वाची ठरली होती. लोकसभा निवडणुकीत मोहिते पाटलांनी प्रणिती शिंदेंना भरभरुन मदत केली होती. तर उत्तम जानकरांनी लोकसभेला दिलेल्या पाठिंब्याची परतफेड विधानसभा निडवणुकीत करण्यात आली होती. त्यामुळे राम सातपुतेंना दोन्ही निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande