उजनी धरणाची मृत पाणी साठ्याकडे वाटचाल
सोलापूर, 16 एप्रिल (हिं.स.) : महाराष्ट्रातील जलाशयांमध्ये केवळ 41 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. अद्याप एप्रिल महिनाही उलटला नाही. पाऊस यायला अजून अडीच ते तीन महिने शिल्लक आहेत. त्यातच महाराष्ट्रातील जलाशयांमध्ये केवळ 41 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. पाणी
Ujania news for tody newsd


सोलापूर, 16 एप्रिल (हिं.स.) : महाराष्ट्रातील जलाशयांमध्ये केवळ 41 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. अद्याप एप्रिल महिनाही उलटला नाही. पाऊस यायला अजून अडीच ते तीन महिने शिल्लक आहेत. त्यातच महाराष्ट्रातील जलाशयांमध्ये केवळ 41 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. पाणी टंचाईमुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो. पुणे, सोलापूर आणि अहिल्यानगर जिल्ह्यासाठी वरदान ठरलेलं उजनी धरण पुढील तीन दिवसांमध्ये मायनसमध्ये जाण्याची शक्यता आहे. उजनी धरणात आता केवळ साडेपाच टक्क्यांहून अधिक आहे. म्हणजे उजनीमध्ये केवळ तीन टीएमसी इतकाच जिवंत पाणीसाठा आहे. त्यानंतर उजनी धरण हे मृत पाणी साठ्यात जाणार आहे. सध्या उजनी धरणामधून भीमा नदी पात्रामध्ये 6 हजार क्यूसेकने विसर्ग सुरू आहे. त्यामुळे उजनीची पाणी पातळी झपाट्याने कमी होत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande