नाफेड ने बाजार समित्यांमध्ये लिलाव प्रक्रियेतून कांदा खरेदी करावा - खा.भगरे
लासलगाव, 16 एप्रिल (हिं.स.) : नाफेड ने महाराष्ट्रातील बाजार समित्यांमध्ये प्रत्यक्ष लिलाव प्रक्रियेतून कांदा खरेदी करावी अशी मागणी केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री ना.शिवराज सिंह चौहान यांचेकडे दिंडोरी मतदार संघाचे खा भास्करराव भगरे यांनी पत्र द
नाफेड ने बाजार समित्यांमध्ये लिलाव प्रक्रियेतून कांदा खरेदी करावा - खा.भगरे


लासलगाव, 16 एप्रिल (हिं.स.) : नाफेड ने महाराष्ट्रातील बाजार समित्यांमध्ये प्रत्यक्ष लिलाव प्रक्रियेतून कांदा खरेदी करावी अशी मागणी केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री ना.शिवराज सिंह चौहान यांचेकडे दिंडोरी मतदार संघाचे खा भास्करराव भगरे यांनी पत्र देऊन आणि समक्ष संपर्क साधून केली आहे.दिल्ली येथे दि १५ रोजी दोन्ही मंत्र्यांच्या भेटीसाठी खा भास्कराव भगरे हे गेले असता त्यांची भेट झाली नाही अखेर संपर्क साधून चर्चा करून मंत्र्याच्या कार्यालयात दोन्ही पत्रे दिली आहेत. या पत्रात महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसमोरील गंभीर समस्येकडे आपले लक्ष वेधू इच्छितो.महाराष्ट्र हा देशातील सर्वात मोठा कांदा उत्पादक राज्य असून,विशेषतः महाराष्ट्रात नाशिक जिल्ह्यात सर्वात जास्त कांद्याचे उत्पादन घेतले जाते सद्या कांद्याचे बाजारभाव खूपच कमी असल्याने शेतकऱ्यांना सध्या मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहेत. सध्या लासलगाव,पिंपळगाव बसवंत,येवला,चांदवड,देवळा,कळवण,दिंडोरी,नांदगाव मालेगांव इत्यादी बाजार समित्यांमध्ये कांद्याची विक्री बाजार समितीत लिलाव प्रक्रियेद्वारे होत असून दर ८०० ते १२५० रुपये प्रति क्विंटल दरम्यान आहेत.हे दर उत्पादन खर्चाच्या तुलनेत खूपच कमी असून शेतकऱ्यांना प्रत्येकी क्विंटलमागे सुमारे रुपये ८०० ते १२०० पर्यंत तोटा सहन करावा लागत आहे.असे नमूद करून यंदा नाफेड केवळ निवडक पोर्टलवर नोंदणीकृत शेतकऱ्यांकडूनच कांदा खरेदी करण्याचा विचार करत आहे.यामुळे प्रक्रिया सुलभ होण्यास मदत होईल, हे खरे असले तरी यामुळे मोठ्या प्रमाणावर शेतकरी वगळले जात आहेत आणि योग्य भावनिर्धारण होत नाही.त्यामुळे त्वरीत नाफेड व इतर शासकीय संस्थांना बाजार समितीच्या लिलाव प्रक्रियेत पूर्वीप्रमाणे सक्रिय सहभाग घेण्याचे निर्देश द्यावेत. यामुळे बाजारभावानुसार कांदा खरेदी शक्य होईल,स्पर्धात्मक दर मिळतील आणि शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादन खर्चाची भरपाई करता येईल,ज्यामुळे त्यांचे आर्थिक संकटही कमी होईल. नाफेडने व्यापाऱ्यांसोबत बाजार समितीत प्रत्यक्ष लिलावात भाग घेतल्यास पारदर्शकता वाढेल,दर चांगले मिळतील आणि संपूर्ण कांदा बाजाराला स्थैर्य लाभेल.आपण या विषयाची गांभीर्याने दखल घ्याल आणि महाराष्ट्रात बाजार समितीत लिलाव प्रक्रियेद्वारे कांदा खरेदीची त्वरित अंमलबजावणी व्हावी अशी मागणी केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांचेकडे दिंडोरी मतदार संघाचे खासदार भास्करराव भगरे यांनी केली आहे. ---------------

हिंदुस्थान समाचार / CHANDRASHEKHAR SUKHDEV GOSAVI


 rajesh pande