सोलापूर : वळसंग परिसरात तरुणावर तलवारीने वार, तीन बोटे तुटली
सोलापूर, 3 एप्रिल (हिं.स.)। सोलापूर-अक्कलकोट रोडवरील वळसंग परिसरातील साहेबलाल वस्तीजवळ बसलेल्या सादिक महिबूब पठाण (३१, रा. बालाजी नगर, कुंभारी) याला चौघांनी बेदम मारहाण केली. त्यात सलमान राज अहमद शेख याने त्याच्याकडील तलवार डोक्यात मारण्याचा प्रयत्न
सोलापूर : वळसंग परिसरात तरुणावर तलवारीने वार, तीन बोटे तुटली


सोलापूर, 3 एप्रिल (हिं.स.)।

सोलापूर-अक्कलकोट रोडवरील वळसंग परिसरातील साहेबलाल वस्तीजवळ बसलेल्या सादिक महिबूब पठाण (३१, रा. बालाजी नगर, कुंभारी) याला चौघांनी बेदम मारहाण केली. त्यात सलमान राज अहमद शेख याने त्याच्याकडील तलवार डोक्यात मारण्याचा प्रयत्न केला, पण तो वार चुकविताना सादिकच्या उजव्या हाताची तीन बोटे तुटली आहेत.

दोन दिवसांपूर्वी सादिक पठाण हा साहेबलाल वस्तीजवळ थांबला होता. त्यावेळी सलमान शेख व अरबाज बागवान हे दोघे अन्य दोघांना घेऊन दुचाकीवरून त्याठिकाणी आले. काही समजण्यापूर्वीच सलमानने त्याच्याकडील तलवार काढून डोक्यात वार करण्याचा प्रयत्न केला. तो वार अडविल्याने हाताच्या बोटांना गंभीर जखम झाली.

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande