जळगाव : तीन तरुणांकडून अवैध शस्त्रसाठा जप्त
जळगाव, 3 एप्रिल (हिं.स.) शहरातील इंदिरा नगर परिसरात तीन तरुणांकडे धारदार तलवारी असल्याची माहिती मिळाल्यानंतर जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाने कारवाई करत तिघांना अटक केली. ही कारवाई भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत करण्यात आली. भुसा
जळगाव : तीन तरुणांकडून अवैध शस्त्रसाठा जप्त


जळगाव, 3 एप्रिल (हिं.स.) शहरातील इंदिरा नगर परिसरात तीन तरुणांकडे धारदार तलवारी असल्याची माहिती मिळाल्यानंतर जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाने कारवाई करत तिघांना अटक केली. ही कारवाई भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत करण्यात आली.

भुसावळ शहरात अवैध शस्त्र बाळगण्याच्या वाढत्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांकडून सतर्कता बाळगली जात आहे. इंदिरा नगर परिसरात काही तरुणांकडे धारदार तलवारी असल्याची माहिती स्थानीक गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने कारवाई केली. पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, पोहेकॉ. कमलाकर बागुल, गजानन देशमुख, गोपाल गव्हाळे, संघपाल तायडे आणि पोकॉ. सचिन पोळ यांनी संशयितांना पकडण्यासाठी सापळा रचला. पथकाने इंदिरा नगर परिसरात छापा टाकून भरत यादव खंडारे (वय 19), सागर अनिल संघवी (वय 20) आणि सागर राजू यादव (वय 25, सर्व रा. इंदिरा नगर, भुसावळ) यांना ताब्यात घेतले. झडती दरम्यान, त्यांच्याकडे विनापरवाना चार धारदार तलवारी आढळल्या, ज्यांची एकूण किंमत 6000 रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.तिन्ही आरोपींविरोधात भारतीय शस्त्र कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांना पुढील कारवाईसाठी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande