नाशिकच्या दुहेरी हत्या प्रकरणी एसआयटी स्थापन
नाशिक, 3 एप्रिल (हिं.स.)। रंगपंचमीच्या दिवशी नशिकमधील उपनगरात दोन भावांची हत्या घडली होती. या प्रकरणी तपास करण्यासाठी म्हणून विशेष चौकशी समितीची स्थापना करण्यात आलेली आहे. तपासासाठी सहायक आयुक्त मिटकेंची नेमणूक करण्यात आलीय. याबाबत अधिक माहिती
नाशिकच्या दुहेरी हत्या प्रकरणी एसआयटी स्थापन


नाशिक, 3 एप्रिल (हिं.स.)। रंगपंचमीच्या दिवशी नशिकमधील उपनगरात दोन भावांची हत्या घडली होती. या प्रकरणी तपास करण्यासाठी म्हणून विशेष चौकशी समितीची स्थापना करण्यात आलेली आहे. तपासासाठी सहायक आयुक्त मिटकेंची नेमणूक करण्यात आलीय. याबाबत अधिक माहिती अशी की, बुधवार दि. १९ मार्च रोजी रंगपंचमीच्या रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बोधलेनगर येथील आंबेडकर वाडी परिसरातील सार्वजनिक शौचालयाजवळ उमेश भगवान जाधव, (३२ )आणि त्याचा भाऊ प्रशांत भगवान जाधव( ३० )या दोघा भावांची याच परिसरात असणाऱ्या संशयित आरोपी सागर मधुकर गरड, ३२, रा. आंबेडकर वाडी उपनगर नाशिक, अनिल विष्णु रेडेकर, ४०, रा. उत्तरानगर पोतदार शाळेजवळ, तपोवनरोड नाशिक, सचिन विष्णु रेडेकर, ४४, रा. गायत्री नगर, पुनारोड नाशिक, अविनाश उर्फ सोनु नानाजी उशिरे, २६, रा. सर्वेश्वर चौक, नविन सिडको उत्तमनगर, नाशिक, योगेश चंद्रकांत रोकडे, ३०, रा. आंबेडकर वाडी, उपनगर नाशिक यांनी पूर्व वैमन्यासातून आणि परिसरात आपले वर्चस्व रहावे म्हणू लोखंडी रॉडचा वापर करून निघृण हत्या केली होती. या घटनेने घटनेला पंधरा दिवसाचा कालावधी लोटल्यानंतरही आरोपींना अटक व इतर तपासा संदर्भामध्ये उशीर होत असल्याच्या कारणाने काही सामाजिक कार्यकर्ते तसेच या परिसरातील नागरिक हे संतप्त झालेले होते त्यांनी या सर्व प्रकरणावरती येत्या सात मार्च रोजी मोर्चा काढण्याचा निर्णय घेतलेला होता यातील मृत्यू जाधव बंधू हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाशी संबंधित होते त्यातील एक भाऊ हा राष्ट्रवादी काँग्रेस चा शहर उपाध्यक्ष होता. सर्व प्रकरणाची दखल घेऊन पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी या प्रकरणाचा तपास करण्यासाठी म्हणून एस आय टी म्हणजेच विशेष चौकशी समितीची स्थापना केली आहे. समितीच्या प्रमुख पदी गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस आयुक्त संदीप मिटके यांची नियुक्ती केली असून त्यांना लवकरात लवकर अहवाल सादर करण्याचे आदेश गुरुवारी देण्यात आलेले आहेत. ---------------

हिंदुस्थान समाचार / CHANDRASHEKHAR SUKHDEV GOSAVI


 rajesh pande