ओटावा, 27 एप्रिल (हिं.स.)।कॅनडात एक भीषण दुर्घटना घडली आहे. कॅनडात व्हॅंकुव्हर येथे एका स्ट्रीट फेस्टिव्हल दरम्यान एका भरधाव कारने अनके लोकांना चिरडल्याची घटना घडली आहे.या घटनेत अनके लोकांचा मृत्यू झाला आहे.तर अनेकजण जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, कॅनडातील व्हॅंकुव्हरमध्ये लोक स्ट्रीट फेस्टिव्हलचा आनंदा साजरा करत असताना ही दुर्दैवी घटना घडली. एका कार चालकाने भरधाव वेगात गर्दीत घुसून अनेकांना चिरडले. स्थानिक वेळेनुसार, शनिवारी (26 एप्रिल) रात्री 8 वाजता ही घटना घडली आहे.
पोलिसांनी म्हटले की, आरोपी कार चालकाला ताब्यात घेण्यात आले असून सध्या त्याची चौकशी सुरु आहे. व्हॅंकुव्हरच्या पोलिसंनी अद्याप मृतांच्या संख्येची पुष्टी केलीली नाही.
दरम्यान सोशल मीडियावर या अपघातानंतरचे व्हिडिओ पाहायला मिळत आहे. या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये मृतदेह रस्त्यावर विखुरलेले दिसत आहेत. या घटनेची माहिती देताना व्हॅंकुव्हर पोलिसांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंट एक्सवर म्हटले की, व्हॅंकुव्हरमध्ये E-14 अव्हेन्यू आणि फ्रेझर येथे स्ट्रीट फेस्टिव्हल साजरा केला जात होता. या दरम्यान रात्री 8 वाजता एका अज्ञात व्यक्तीने भरधाव वेगात येऊन लोकांना धडक दिली. अनेक लोकांना चिरडण्यात आले. यामुळे अनेकांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी आहेत. या घटनेनंतर पोलिसांनी कार चालकाला ताब्यात घेतले आहे.
दरम्यान व्हॅंकुव्हरचे महापौर केन सिम यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, फिलिपिनो वारसा आणि संस्कृतीचा उत्सव साजरा करणाऱ्या लापू लापू लापू डे फेस्टिव्हलमध्ये या घटनेबद्दल दु:ख झाले. तसेच स्थानिक अधिकाऱ्यांनी या घटनेमागील हेतू काय होता हे अद्याप स्पष्ट केलेले नाही. परंतु हा हल्ला असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. तसेच अलीकडच्या काही काळात कॅनडामध्ये अशा अनेक प्रकारच्या घटना समोर आल्या आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode