चंद्रपूर : मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे मिळाला ४५ कंत्राटी कामगारांना न्याय
चंद्रपूर, 27 एप्रिल (हिं.स.)। आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयात कर्मचारी कक्ष सेवक म्हणून नियुक्त ४५ कंत्राटी कामगारांना न्याय मिळाला आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, चंद्रपूर यांच्या अधिनस्त अ
चंद्रपूर : मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे मिळाला ४५ कंत्राटी कामगारांना न्याय


चंद्रपूर, 27 एप्रिल (हिं.स.)।

आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयात कर्मचारी कक्ष सेवक म्हणून नियुक्त

४५ कंत्राटी कामगारांना न्याय मिळाला आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, चंद्रपूर यांच्या अधिनस्त असलेल्या रुग्णालयात ४५ सुरक्षा कर्मचारी गत १० ते १५ वर्षापासून कंत्राटी तत्वावर कार्यरत होते. महाराष्ट्र सुरक्षा बल मार्फतीने नवीन सुरक्षा रक्षकांची भरती करण्यात आल्यामुळे उक्त ४५ कंत्राटी सुरक्षा रक्षकांना कामावरून कमी करण्यात आले होते, त्यामुळे त्यांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता.

या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेत, मे.स्मार्ट सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या मार्फतीने सफाई कामगारांची भरती करण्यात येणार असल्याने या पदावर त्यांना सेवेची संधी मिळण्याची विनंती केली होती. याची दखल घेत आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी या सफाई कामगारांना सदर कंपनीमार्फत चंद्रपूरचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता यांना पत्राद्वारे कळविले होते. त्या अनुषंगाने योग्य कार्यवाही करून ४५ सुरक्षा कर्मचाऱ्यांना मे. स्मार्ट सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमार्फत कक्षसेवक पदावर नियुक्ती देण्यात आली असून त्यांना न्याय मिळाला आहे.

कंत्राटी तत्वावर कक्षसेवक पदावर नियुक्ती मिळालेल्या गौरी उंदीरवाडे, रूपा येरगुडे, दीपक वर्मा, संध्या आडेकर, गुड्डू निमसरकार, पृथ्वीराज मरस्कोल्हे, ममता राठोड, अक्षय सुखदेवे, प्रेम बारसागडे, प्रियंका अमरपवार, विश्वनाथ उराडे आदींनी आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या जनसंपर्क कार्यालयात येऊन त्यांचा सत्कार केला व आभार मानले.

---------------

हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव


 rajesh pande