डॉ. प्रकाश कांकरीया हल्ला प्रकरणी १७ आरोपींना प्रत्येकी एक वर्ष कैदेची शिक्षा
अहिल्यानगर, 27 एप्रिल (हिं.स.)। प्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ डॉ. प्रकाश कांकरीया यांच्या वर हल्ला, काळे फारसे व चोरी प्रकरणी दाखल केलेल्या गुन्हयातील १७ आरोपींना जिल्हा व सत्र न्यायाधीश क. ३ एस.व्ही. सहारे यांनी प्रत्येकी एक वर्ष कैदेची शिक्षा व प्रत्येकी
डॉ. प्रकाश कांकरीया हल्ला प्रकरणी १७ आरोपींना प्रत्येकी एक वर्ष कैदेची शिक्षा


अहिल्यानगर, 27 एप्रिल (हिं.स.)।

प्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ डॉ. प्रकाश कांकरीया यांच्या वर हल्ला, काळे फारसे व चोरी प्रकरणी दाखल केलेल्या गुन्हयातील १७ आरोपींना जिल्हा व सत्र न्यायाधीश क. ३ एस.व्ही. सहारे यांनी प्रत्येकी एक वर्ष कैदेची शिक्षा व प्रत्येकी १ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.

आरोपी नामे १. संजीव बबनराव भोर, रा. पाईपलाईन रोड, पंचवटी नगर, अहमदनगर २. महादेव परशुराम भगत, रा. कापूरवाडी, ता.जि. अहमदनगर ३. बलभीम परशुराम भगत, रा. कापूरवाडी, ता.जि. अहमदनगर ४. बाबासाहेब बाबुराव जरे, रा. इमामपूर, ५. संतोष विठ्ठल वाडेकर, रा. देसवडे, ता. पारनेर, जि. अहमदनगर, ६. आदीनाथ शंकरराव काळे, रा. वांजोळी, ता. नेवासा, जि. अहमदनगर ७. रमेश अशोक बाबर, रा. बाबर मळा, बुरुडगाव रोड, अहमदनगर, ८. आरोपी मयत, ९. किशोर सुनील आर्डे, रा. मशिदीच्या बाजूला, बोल्हेगाव, अहमदनगर, १०. अरूण बाबासाहेब ससे, रा. जेउर, ता.जि. अहमदनगर, ११, संदिप उर्फ मेजर शंकर पवार, रा. एम.आय.डी.सी. अहमदनगर, १२. शरद उर्फ बाळू गदाधर, रा. एम.आय.डी.सी. अहमदनगर, १३. कैलास शिवाजी पठारे, रा. जेऊर, ता.जि. अहमदनगर, १४. योगेश उर्फ भावड्या गोविंद आर्डे, रा. मल्हार नगर, एम.आय.डी.सी. अहमदनगर, १५. गणेश उर्फ भैया जितेंद्र शिंदे, रा. मल्हार नगर, एम.आय.डी. सी. अहमदनगर, १६. विठ्ठल उमेश गुडेकर, रा. मल्हार नगर, एम.आय.डी.सी. अहमदनगर, १७. बापू बाबासाहेब विरकर, रा. मल्हार नगर, एम.आय.डी.सी. अहमदनगर, १८. सागर कडुबा घाणे, रा. नवनागापूर, एम.आय.डी. सी. अहमदनगर यांना शिक्षा सुनावली आहे.

सरकार पक्षातर्फे अति. सरकारी अभियोक्ता अर्जुन पवार , अति. सरकारी वकील केदार केसकर यांनी काम पाहिले.

सदर घटनेची थोडक्यात हकिकत अशी कि, फिर्यादी डॉ. प्रकाश कन्हैयालाल कांकरीया, धंदा वैदयकीय, रा. माणिकचौक, यांनी कोतवाली पोलीस स्टेशन येथे दि. २४/ १२/२००८ रोजी फिर्याद दाखल केली होती. त्यानुसार ते साई सुर्या नेत्रालय या नावाचे हॉस्पीटल चालवित होते.दि. १८/१२/२००८ रोजी त्यांचेकडे एक महिला पेशंट आलेली होती व तिचे तपासणीचे घेण्यात आलेली रू.१००/- फी यावरून तिचे पती यांनी हॉस्पीटल मध्ये घुसून मारहाण व सामानाची तोडफोड केली होती. त्याबाबत फिर्यादी यांनी कोतवाली पोलीस स्टेशन येथे आरोपी विरूद्ध गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर वरील महिलेच्या पतीने व महिलेने फिर्यादी यांचेविरूद्ध विनयभंगाची तकारही दाखल केली होती. त्यानंतर त्या महिलेचे पती विनयभंगाची तकार मिटवण्यासाठी फिर्यादी यांना रू. ११ लाखांची मागणी करून धमकी देत होते. त्यानंतर दि. २४/१२/२००८ रोजी दुपारी २.३० वा. थे सुमारास महादेव परसराम भगत, बलभीम परसराम भगत व त्यांचेबरोबर २० ते २५ लोक फिर्यादी डॉक्टर यांच्या हॉस्पीटलच्या केबिनमध्ये आले त्यामध्ये संजीव भोर, आदीनाथ काळे, बाबा जरे, सतीश वाडेकर, व इतर अनोळखी असे होते. त्यांनी त्यांच्या हातातील लाकडी दांडक्याने हॉस्पीटलचे नुकसान केले. फिर्यादी यांचे गळयातील ५ तोळे सोने, त्यांचा मोबाईल व हॉस्पीटल मधील रु.७०,०००/- इतकी रक्कम बळजबरीने काढून घेतली, त्यांनी फिर्यादी यांना हॉस्पीटलच्या बाहेर आणले.त्यानंतर त्यांनी फिर्यादी यांचे डोक्यावर एका डब्यातील काळया रंगाचे ऑईल ओतले. त्यातील काही लोकांनी फिर्यादीच्या तोंडाला काळे फासले व फिर्यादी यांना पायी फरफटत माणिक चौक ते कापडबाजार असे घेवून गेले. त्यावेळी त्यांनी त्यांचे गळयामध्ये चपलांचा हार व गळयामध्ये पाणेरडा मजकूर असलेला बोर्ड अडकवले, त्यावेळी तेथे चार-पाच पोलीस आले व फिर्यादी यांची सुटका करून पोलीस स्टेशनला घेवून गेले.

वरील घटनेबाबत फिर्यादी यांनी कोतवाली पोलीस स्टेशन येथे आरोपीच्या विरूद्ध फिर्याद दाखल केली. गुन्हा दाखल झालेनंतर तपासी अधिकारी यांनी वरील गुन्हयाचा संपूर्ण तपास करून आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले.दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर गुन्हयामध्ये भा.दं.वि. कलम ३९५ सह कलम १४९ असल्यामुळे सदरचा खटला सत्र न्यायालया कडे वर्ग करण्यात आलेला आहे. न्यायालयाच्या रेकॉर्डवर आलेला साक्षीपुरावा पाहून न्यायालयाने वरील सर्व आरोपींना भा.दं. वि. कलम ३९५ सह कलम १४९, भा.दं.वि. कलम ३८५ सह कलम १४९, भा.दं.वि. ४२७ सह कलम १४९ मधून न्यायालयाने सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केलेली होती.परंतू वरीलप्रमाणे उर्वरीत कलमांनुसार न्यायालयाने आरोपींना दोषी धरून वरीलप्रमाणे शिक्षा दिलेली आहे.

वरील केसमध्ये सरकारी पक्षातर्फे एकूण ७ साक्षीदार तपासण्यात आले. त्यापैकी फिर्यादी यांची साक्ष महत्वपूर्ण मानण्यात आली. न्यायालयाचे रेकॉर्डवर आलेला कागदोपत्री पुरावा, तोंडी पुरावा व अति. सरकारी वकील अर्जुन पवार यांचा युक्तीवाद ग्राहय धरून मा. न्यायालयाने वरील आरोपींना वरीलप्रमाणे शिक्षा दिलेली आहे. साक्षी पुरावा नोंदवितेवेळी पैरवी अधिकारी सहा. फौजदार विलास साठे यांनी सरकारी वकीलांना सहाय्य केले.

हिंदुस्थान समाचार / Shirish Kulkarni


 rajesh pande