भीमा नदीकाठचा वीजपुरवठा खंडित करा - जिल्हाधिकारी
सोलापूर, 27 एप्रिल (हिं.स.)। उजनी धरणातून भीमा नदीद्वारे पाणी पिण्यासाठी सोडले आहे. ते पाणी हिळ्ळी बंधार्‍यापर्यंत पोहचले नाही. त्यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी गुरुवारपासून (दि. 24) ते पुढील आदेशापर्यंत नदीकाठचा कृषी पंपाचा विद्युत पुरवठा
भीमा नदीकाठचा वीजपुरवठा खंडित करा - जिल्हाधिकारी


सोलापूर, 27 एप्रिल (हिं.स.)।

उजनी धरणातून भीमा नदीद्वारे पाणी पिण्यासाठी सोडले आहे. ते पाणी हिळ्ळी बंधार्‍यापर्यंत पोहचले नाही. त्यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी गुरुवारपासून (दि. 24) ते पुढील आदेशापर्यंत नदीकाठचा कृषी पंपाचा विद्युत पुरवठा खंडित करण्याचे आदेश महावितरणला दिले आहेत.

विजयपूर जिल्ह्यातील इंडी, चडचण तालुका हद्दीतील भीमा नदी काठच्या कृषी पंपाचा विद्युतपुरवठा खंडित करण्याबाबत विजयपूरच्या जिल्हाधिकार्‍यांना पत्र दिले आहे. त्यामुळे आता शेतकर्‍यांसमोर ऐन उन्हाळ्यात पिके जगविण्याचे आव्हान उभे राहिले आहे.

सोलापूर, पंढरपूर, मंगळवेढा, सांगोला शहराच्या पाणी पुरवठ्यासाठी व भीमा नदी तिरावरील ग्रामीण पाणीपुरवठा योजनांसाठी उजनी धरणातून भीमा नदी पात्रात आठ एप्रिलपासून पाणी सोडले आहे. उजनी धरणातून सोडलेले पाणी केवळ पिण्यासाठीच सोडले आहे. पाणी अद्याप कोल्हापूर पद्धतीच्या हिळ्ळी बंधार्‍यापर्यंत पोहोचले नाही. पिण्याच्या पाण्याचा शेतीसाठी उपसा होऊ नये म्हणून भीमा नदीच्या दोन्ही तिरावरील शेती पंपाचा विद्युतपुरवठा खंडित केला आहे. अत्यावश्यक सेवांसाठी तीन तास विद्युत पुरवठा चालू ठेवण्याबाबतचे पत्र पाटबंधारे विभागाने जिल्हाधिकार्‍यांना दिले होते. त्यानुसार जिल्हाधिकार्‍यांनी विद्युत पुरवठा खंडित करण्याबाबतचे आदेश महावितरणला दिले आहेत.

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande