राज्यात मागील सहा वर्षांत लाखो विद्यार्थी आणि एक हजार 705 शाळांची संख्या घटली
सोलापूर, 27 एप्रिल (हिं.स.)। राज्यात मागील सहा वर्षांत लाखो विद्यार्थी आणि एक हजार 705 शाळांची संख्या घटली आहे. ही संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने चिंतेची बाब आहे. शाळा आणि विद्यार्थ्यांची संख्या घटू नये, यासाठी उपाययोजना करण्याची गरज आहे.मागील सहा
School News fro photo newsss


सोलापूर, 27 एप्रिल (हिं.स.)।

राज्यात मागील सहा वर्षांत लाखो विद्यार्थी आणि एक हजार 705 शाळांची संख्या घटली आहे. ही संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने चिंतेची बाब आहे. शाळा आणि विद्यार्थ्यांची संख्या घटू नये, यासाठी उपाययोजना करण्याची गरज आहे.मागील सहा वर्षांत लाखो विद्यार्थी आणि दीड हजारांपेक्षा जास्त शाळांची संख्या कमी झाल्याची आकडेवारी यू-डायस प्लस अहवालातून समोर आली आहे. त्यामुळे शिक्षकांनी वेळीच सावध होण्याची गरज आहे. मात्र, याकडे शासनासह शिक्षक दुर्लक्ष करत आहेत.

गेल्या काही वर्षांपासून शासनाकडून शैक्षणिक गुणवत्तेत सुधारणा करण्याचे प्रयत्न चालू आहेत. त्यामुळे विद्यार्थी आणि शाळांची पटसंख्या वाढणे आवश्यक असताना ती घटत असल्याने शिक्षकांवर उपासमारीची वेळ येण्यास उशीर लागणार नाही.गेल्या काही वर्षांपासून राज्यातील शाळा आणि विद्यार्थ्यांची संख्या सातत्याने घटत आहे. त्यामुळे शासनाने वेळीच सावध होऊन योग्य त्या उपाययोजना करुन शाळा, विद्यार्थी टिकविले पाहिजेत. त्यासाठी शासनाने ठोस पाऊल उचलणे गरजेचे आहे. अन्यथा पुढील काळातही शाळांच्या संख्येत घट होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande