विजेचा धक्का लागून शेतकऱ्याचा मृत्यू
सोलापूर, 27 एप्रिल (हिं.स.)। धामणगाव आ (ता. बार्शी) येथील शेतात वन्य प्राणी पिकांचे नुकसान करण्यासाठी येऊ नयेत, म्हणून लाकडी दांडक्याला लोखंडी तार जोडून वीजप्रवाह सुरू केल्यानंतर शेतकऱ्याचा विजेचा धक्का बसून मृत्यू झाला असून, बार्शी तालुका पोलिस ठाण
विजेचा धक्का लागून शेतकऱ्याचा मृत्यू


सोलापूर, 27 एप्रिल (हिं.स.)।

धामणगाव आ (ता. बार्शी) येथील शेतात वन्य प्राणी पिकांचे नुकसान करण्यासाठी येऊ नयेत, म्हणून लाकडी दांडक्याला लोखंडी तार जोडून वीजप्रवाह सुरू केल्यानंतर शेतकऱ्याचा विजेचा धक्का बसून मृत्यू झाला असून, बार्शी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

बाबाराव निवृत्ती ढोणे (रा. धामणगाव आ, ता. बार्शी) असे गुन्हा दाखल झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. शोभा ढोणे यांनी फिर्याद दाखल केली. रघुनाथ निवृत्ती ढोणे (वय ६५) असे मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. आम्ही पुणे येथे मुलीकडे राहण्यास असून, धामणगाव येथे गट नं.४५ शेती आहे. गावची यात्रा असल्याने दोघेजण आलो होतो.त्यानंतर ज्वारीच्या काढणीसाठी पती रघुनाथ थांबले होते, शेजारील शेतकरी बाबराव ढोणे याने वन्यप्राणी शेतात येऊ नयेत म्हणून बेकायदा बांधावर लाकडी दांडक्याला लोखंडी तार बांधून वीजप्रवाह सुरू केल्यामुळे माझे पतीचा मृत्यू झाला असे फिर्यादीत म्हटले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande