लखनऊ संघाच्या दिग्वेश राठीवर बीसीसीआयची कठोर कारवाई
लखनऊ , 20 मे (हिं.स.)।आयपीएल 2025 स्पर्धेत लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी त्याच्या आक्रमक सेलिब्रेशनमुळे चर्चेत आला आहे. लखनौच्या एकाना क्रिकेट स्टेडिअमवर १९ मे रोजी झालेल्या सामन्यावेळी दिग्वेशने जे कृत्य केले त्यामुळे मैदानावरच खेळाडू भिडण्याची व
Digvesh rathi


लखनऊ , 20 मे (हिं.स.)।आयपीएल 2025 स्पर्धेत लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी त्याच्या आक्रमक सेलिब्रेशनमुळे चर्चेत आला आहे. लखनौच्या एकाना क्रिकेट स्टेडिअमवर १९ मे रोजी झालेल्या सामन्यावेळी दिग्वेशने जे कृत्य केले त्यामुळे मैदानावरच खेळाडू भिडण्याची वेळ आली.याची दखल आता बीसीसीआयने घेतली असून दिग्वेश राठीवर कठोर शिक्षा केली आहे.

बीसीसीआयने दिग्वेशवर आयपीएल कोड ऑफ कंडक्टचे उल्लंघन केल्यामुळे त्याच्या मॅचच्या फीवर ५० टक्के दंड लावला आहे. त्याशिवाय दिग्वेशवर वारंवार एका चुकीची पुनरावृत्ती केल्याने एका मॅचची बंदी आणली आहे. इतकंच काय तर त्याच्या खात्यात 5 डिमेरिट पॉइंट्स जमा झाले आहेत. गुजरात टायटन्सविरोधातील सामन्यात लखनौ सुपर जायटंसकडून दिग्वेशला वगळण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्यामुळे येत्या २२ मे रोजी खेळवण्यात येणाऱ्या गुजरात टायटन्सविरोधातील सामन्यात दिग्वेश खेळताना दिसणार नाही.दुसरीकडे सनराइजर्स हैदराबादचा ऑलराऊंडर अभिषेक शर्मावरही आयपीएल कोड ऑफ कंडक्टचं उल्लंघन केल्याप्रकरणी मॅच फीमध्ये २५ टक्के दंड आकारला आहे. या सीजनमध्ये अनुच्छेद २.६ अंतर्गत हा त्याचा पहिला गुन्हा असल्याने त्याला एक डिमेरिट पाँईट मिळाला आहे. कोड ऑफ कंडक्टचा लेवल १ उल्लंघन केल्यास मॅच रेफरीचा निर्णय अंतिम आणि बंधनकारक असतो. १९ मे रोजी खेळवण्यात येणाऱ्या सामन्यात दिग्वेशने सनराईजर्स हैदराबादचा सलामी फलंदाज अभिषेक शर्माला आऊट केल्यानंतर आक्रमक शैलीत विकेटचा जल्लोष केला. ते अभिषेक शर्माला बिल्कुल आवडले नाही. दिग्वेशच्या डिवचण्यामुळे अभिषेक आणि त्याच्यात मैदानातच वाद झाला. दोघांनाही जवळ येत असल्याचे पाहून पंचांनी हस्तक्षेप केला आणि परिस्थिती शांत केली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande