आरोपींकडून 4.85 लाखांचे अंमलीपदार्थ जप्त
नागपूर, 02 जून (हिं.स.) : कामठी-नागपूर रोडवरील खैरी बस स्टॉपजवळील न्यू शान-ए-पंजाब लॉजमध्ये ड्रग्ज एमडीची विक्री करताना पोलिसांनी 3 जणांना अटक केली. आरोपींकडून 4 लाख 85 हजार 720 रुपयांचा माल जप्त केला. मध्यरात्रीच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. आरोपींकडून 46.72 मेट्रिक ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले.
न्यू शान-ए-पंजाब लॉजमध्ये एमडी ड्रग्ज पावडर विकली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे, रविवारी रात्री 11 वाजता कामठी-नागपूर रोडवरील खैरी बस स्टॉपसमोर आरोपी तारिक परवेझ मोहम्मद खुर्शीद, बिलाल नागानी, मोहम्मद अनीस नागानी आणि मोहम्मद अमन मोहम्मद रफीक यांना अटक करण्यात आली. पोलिसांनी रात्री 11 वाजता लॉजवर छापा टाकला आणि तिन्ही आरोपींना अटक केली. आरोपींकडून 46.72 ग्रॅम एमडी पावडर, ज्याची किंमत 2 लाख 33 हजार 600 रुपये आहे. तसेच 6 मोबाईल फोन, दोन मोटारसायकली असा एकूण 4 लाख 85 हजार 720 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी
पोलिसांनी कलम 8(अ), 22(अ), 29 एनडीपीएस अंतर्गत गुन्हा दाखल करून तिन्ही आरोपींना अटक केली. या प्रकरणात लवकरच आणखी आरोपींना अटक करणार असल्याचे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले.
------------------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु