मनमाड, 9 मे (हिं.स.)। भारतीय कम्युनिस्ट पक्ष नाशिक जिल्हा अधिवेशन रविवार 11 मे 2025 रोजी सकाळी 10 वाजता जैन धर्मशाळा नांदगाव येथे आयोजित करण्यात आले आहे. रॅली काढून जिल्हा अधिवेशनाची सुरुवात होणार आहे. अधिवेशनासाठी राज्य सचिव भारतीय कम्युनिस्ट पक्ष चे ॲड. सुभाष लांडे सह सचिव डॉ. राम बाहेती उपस्थित राहणार आहेत. अधिवेशनाच्या उद्घाटन सत्राचे अध्यक्ष राज सह सचिव कॉ. राजू देसले असणार आहेत.
अधिवेशनात भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे शताब्दी वर्ष निमित्ताने विवीध कार्यक्रम, नाशिक जिल्हा त पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी निर्णय शेतकरी कामगार प्रश्नांवर चर्चा करण्यात येणार आहे. नाशिक जिल्हा 3 वर्ष कामाचा आढावा घेत येणाऱ्या काळात जिल्हा परिषद निवडणूक, मनपा निवडणूक बाबत निर्णय घेण्यात येणार आहेत. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नाशिक जिल्हा अधिवेशन रॅली त मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
हिंदुस्थान समाचार / CHANDRASHEKHAR SUKHDEV GOSAVI