जळगाव, 9 मे (हिं.स.) भारतीय सैन्यात अधिकारी होण्याची इच्छा असलेल्या तांत्रिक शाखेतील पदवीधर विद्यार्थ्यांसाठी ही एक महत्वाची संधी आहे. भारतीय सैन्याने टेक्निकल ग्रॅज्युएट कोर्स (TGC-142) साठी अधिसूचना प्रकाशित केली आहे. ही अधिसूचना अधिकृत संकेतस्थळwww.joinindianarmy.nic.inवर उपलब्ध आहे. या योजनेअंतर्गत तांत्रिक पदवीधरांना भारतीय सैन्यात अधिकारी म्हणून सामील होण्याची संधी आहे.
विद्यार्थीwww.joinindianarmy.nic.inया संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात. ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम तारीख 29 मे 2025 आहे. या कोर्ससाठी फक्त तांत्रिक शाखेतील पदवीधर उमेदवारच अर्ज करू शकतात. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर