जळगाव, 9 मे (हिं.स.)) केंद्र शासनाच्या भारतीय तंत्रविज्ञान संस्थेतील २०२५-२६ या शैक्षणिक सत्रासाठी तीन वर्षीय (सहासत्रीय) हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका अभ्यासक्रमाच्या प्रथम सत्रासाठी महाराष्ट्र राज्यातून बरगड (ओडिशा) येथील १३+१ जागांसाठी (तसेच वेंकटगिरीसाठी २ जागा काउंसिलिंगद्वारे भरल्या जाणार आहेत) पात्र उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे.
या प्रवेशासाठी इच्छुक उमेदवारांनी विहित नमुन्यातील प्रवेश अर्ज दि. १० जून २०२५ पर्यंत प्रादेशिक उपआयुक्त, वस्त्रोद्योग कार्यालय — नागपूर, सोलापूर, मुंबई किंवा छत्रपती संभाजीनगर — येथे सादर करावेत.
प्रवेश अर्जाचा नमुना आणि इतर संबंधित माहिती वस्त्रोद्योग आयुक्तालयाच्या अधिकृत संकेतस्थळावरhttp://www.dirtexmah.gov.inउपलब्ध आहे. तसेच, अर्जाचे नमुने सर्व प्रादेशिक उपआयुक्त, वस्त्रोद्योग यांचे कार्यालयातही उपलब्ध आहेत. अशी माहिती संजय देने, भा.प्र.से., आयुक्त, वस्त्रोद्योग, महाराष्ट्र राज्य, यांनी एका परिपत्रकाद्वारे दिली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर