आरोग्य सेवक पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना तात्काळ नियुक्त्या देण्याची मागणी
लासलगाव, 9 मे (हिं.स.)। आरोग्य सेवक पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना तात्काळ नियुक्त्या देण्यात याव्या या मागणीचे लेखी निवेदन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना भाजपाचे नाशिक (ग्रामीण) जिल्हा उपाध्यक्ष सुशील भोसले व शिष्टमंडळाने दिले आहे.
आरोग्य सेवक पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना तात्काळ नियुक्त्या देण्याची मागणी


लासलगाव, 9 मे (हिं.स.)।

आरोग्य सेवक पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना तात्काळ नियुक्त्या देण्यात याव्या या मागणीचे लेखी निवेदन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना भाजपाचे नाशिक (ग्रामीण) जिल्हा उपाध्यक्ष सुशील भोसले व शिष्टमंडळाने दिले आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या आठ महिन्यापासून आरोग्य सेवक पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल लागून देखील अद्याप पर्यंत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना नियुक्तीचे आदेश न मिळाल्याने १२६ उमेदवारांचे मानसिक संतुलन खचत असल्याने त्यांचे भवित्यव्य धोक्यात आहे.या बाबत जिल्ह्यातील विविध आमदारांनी देखील पत्रव्यवहार केला आहे. मात्र, अद्याप पर्यंत या उमेदवारांना नियुक्तीचे आदेश मिळालेले नाही.

या प्रकरणी निवड झालेल्या उमेदवारांनी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा(ग्रामीण) उपाध्यक्ष (अ.जा.) सुशील सुधाकर भोसले यांच्या सह आ छगन भुजबळ यांची भेट घेत त्यांच्या व्यथा मांडल्या. यावेळी आ. छगन भुजबळ यांनी जिल्हा परिषद आरोग्य अधिकारी यांच्या सोबत चर्चा करून तात्काळ नियुक्तीचे आदेश देण्यासाठी पुढील कार्यवाही करावी, असे आदेश दिले.

हिंदुस्थान समाचार / CHANDRASHEKHAR SUKHDEV GOSAVI


 rajesh pande