जळगाव , 9 मे (हिं.स.) जळगावसह राज्यातील अनेक ठिकाणी वादळी पावसाने झोडपून काढले असून यामुळे शेतीपिकाचे मोठं नुकसान झाले आहे. यातच हवामान खात्याने राज्याच्या विविध भागात आज ९ मेपासून चार दिवस वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता. १४ जिल्ह्यांना वादळी वाऱ्यांसह पावसाचा इशारा दिला असून यासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.आज मध्य महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, सातारा, कोल्हापूर तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर आणि विदर्भातील यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. यासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
राज्यावर अवकाळीचे संकट कायम असून जळगाव जिल्ह्यात मागच्या काही दिवसात वादळी पावसाने हजेरी लावली. यामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.
दरम्यान आजपासून पुढचे चार दिवस जळगाव जिल्ह्यात पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. यादरम्यान ५० ते ६० किमी वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर