अकोला पोलिसांनी काही तासांत केली अपहृत बालिकेची सुटका
अकोला, 09 मार्च (हिं.स.)। अकोल्यातील रामदासपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दीड वर्षाच्या चिमुकलीला पळवून नेण्याची घटना घडली होती. मात्र पोलिसांनी तातडीने शोध मोहीम राबवत काही तासांतच आरोपीच्या तावडीतून चिमुकलीची सुखरूप सुटका केली आहे. मिळालेल्या मा
Photo


अकोला, 09 मार्च (हिं.स.)। अकोल्यातील रामदासपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दीड वर्षाच्या चिमुकलीला पळवून नेण्याची घटना घडली होती. मात्र पोलिसांनी तातडीने शोध मोहीम राबवत काही तासांतच आरोपीच्या तावडीतून चिमुकलीची सुखरूप सुटका केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मनोहर उर्फ फुलसिंग सोलंकी (वय ३०, रा. शाहूपूर, जिल्हा बुरहानपूर, मध्यप्रदेश) हा अकोल्यातील केळकर हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असताना आज सकाळी चारच्या सुमारास हॉस्पिटलमधून दीड वर्षाच्या मुलीला कोणालाही न सांगता सोबत घेऊन निघून गेला. याची माहिती मुलीच्या आईने रामदासपेठ पोलीस ठाण्यात दिल्यानंतर पोलिसांनी तातडीने शोध सुरू केला.तांत्रिक माहिती आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने पोलिसांनी आरोपीचा शोध घेत अकोट रोड परिसरातून त्याला ताब्यात घेत चिमुकलीची सुखरूप सुटका केली. त्यानंतर मुलीला तिच्या आईच्या ताब्यात देण्यात आले,पोलिसांनी केलेल्या या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande