अकोल्यातील जुने शहर भागात प्रचंड दगडफेक!
अकोला, 09 मार्च (हिं.स.)। अकोला शहराच्या जूनेशहर भागातील गाडगे नगर आणि सोनटक्के प्लॉट मधील दोन गटात दारूच्या नशेत वाद झाला, या वादात दोन्ही गटांनी एकमेकांवर दगडफेक केली, या दगडफेकीत काही वाहनांचे नुकसान झाले आहे. पोलिसांनी दोन्ही गटातील काही लोकांन
Photo


अकोला, 09 मार्च (हिं.स.)। अकोला शहराच्या जूनेशहर भागातील गाडगे नगर आणि सोनटक्के प्लॉट मधील दोन गटात दारूच्या नशेत वाद झाला, या वादात दोन्ही गटांनी एकमेकांवर दगडफेक केली, या दगडफेकीत काही वाहनांचे नुकसान झाले आहे. पोलिसांनी दोन्ही गटातील काही लोकांना ताब्यात घेतल्यानंतर परिस्तिथी नियंत्रण आली आहे. सध्या या भागात तणावपूर्ण शांतता आहे. सुदैवाने या दगफेकीत कोणीही जखमी झाला नाही. याप्रकरणी पोलीसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही दगडफेकीची घटना फटाके फोडण्याच्या वादातून झाल्याची प्राथमिक माहिती आहे. याप्रकरणी पोलीस तपास करत आहे. दरम्यान कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

अकोल्यातील जुने शहर भागातल्या हरिहरपेठमधील सोनटक्के प्लॉट आणि गाडगेनगर भागात दोन समुदायात जोरदार राडा झाला आहे. यात दोन्ही बाजूने एकमेकांवर मोठ्या प्रमाणात दगडफेक करण्यात आली. भारत टी ट्रेंटी क्रिकेट विश्वचषकाचा सामना जिंकल्यानंतर फटाके फोडण्यावरून दोन गटांत झालेल्या वादा नंतर हा राडा झाला. रात्रीच्या वेळी दोन समुदाय एकमेकांसमोर आलेय. अडीच वर्षांपूर्वी या भागात दोनदा दंगल झाली. भारताने विश्वचषक जिंकल्यानंतर फटाके फोडण्यावरून दोन गटात वाद झालाय. त्यानंतर दोन्ही गट आमने-सामने आल्यानंतर मोठ्या प्रमाणात दगडफेक झाली. यात दोन चारचाकी वाहनांची तोडफोड करण्यात आलीय. याचे cctv व्हिडिओ देखील समोर आलेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande