धुळे,, 9 मे (हिं.स.) शेतक-यांना खरीप हंगाम 2025 मध्ये दर्जेदार बियाणे, खते व किटकनाशके पुरेशा प्रमाणात व वाजवी दरात उपलब्ध होण्याच्या दृष्टीने जिल्ह्यातील कृषि निविष्ठा उत्पादक व विक्रेत्यांची कार्यशाळा कृषि महाविद्यालय, धुळे येथील अभियांत्रिकी सभागृहात संपन्न झाली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी सुरज जगताप, कृषि विकास अधिकारी सिताराम चौधरी, कृषि विज्ञान केंद्र, धुळे विषय विशेषज्ञ डॉ. पंकज पाटील, नोडल अधिकारी, स्मार्ट प्रकल्प विनय बोरसे, तंत्र अधिकारी (गुनि), विभागीय कृषि सह संचालक कार्यालय, नाशिक उल्हास ठाकूर, धुळे जिल्हा सिड्स पेस्टीसाईड्स, फर्टीलायझर डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष मानसिंग गिरासे हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.
प्रास्ताविकात बोलतांना जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी,श्री. जगताप म्हणाले की, खरीप हंगामात कोणीही कृषि निविष्ठा सोबत कोणत्याही प्रकारे लिकींग करु नये तसे आढळल्यास सक्त कारवाई करण्यात येईल अशा सूचना सर्व उत्पादक व विक्रेत्यांना दिल्यात.
कृषि विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ञ डॉ. पंकज पाटील यांनी कापुस, मका, कांदा, तुर इत्यादी पिकाचे एकात्मीक पद्धतीने किड रोग नियंत्रणाबाबत तसेच गुलाबी बोंड अळी व्यवस्थापनासाठी कापुस लागवड, कापुस पिकाची लावगड करतांना माती परिक्षण अहवाल तसेच विद्यापीठाने शिफारस केल्याप्रमाणे सेंद्रीय व रासायनिक खतांचा अवलंब केल्यास कापसाचे लाल्या रोगा पासुन प्रतिबंध होऊन उत्पादकता वाढविण्याबाबत, शासनाच्या निर्देशानुसार कापसाची लागवड दिनांक 1 जुन नंतर करण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
कार्यशाळेत बियाणे कायदे बाबत जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरिक्षक अरुण तायडे, खत नियंत्रण आदेश बाबत जिल्हा कृषि अधिकारी (सा) भास्कर जाधव, किटकनाशक कायदा व किटकनाशक फवारणी करतांना शेतक-यांनी घ्यावयाची काळजी बाबत तंत्र अधिकारी, मनोजकुमार सिसोदे, ई-पॉस प्रणाली व कृषक अॅपबाबत कृषि अधिकारी (सा) पंचायत समिती, साक्री अभय कोर, साथी पोर्टलद्वारे बियाणे विक्रीबाबत जिल्हा व्यवस्थापक महाबीज छबीलाल सुर्यवंशी, कृषि निविष्ठा विक्रेत्यांच्या कर्तव्य व जबाबदाऱ्या बाबत कृषि विकास अधिकारी सिताराम चौधरी यांनी मार्गदर्शन केले.
तंत्र अधिकारी (गुनि), विभागीय कृषि सह संचालक कार्यालय, नाशिक उल्हास ठाकुर यांनी शेतकऱ्यांनी अनधिकृत एचटीबीटी कापुस बियाणे खरेदी न करता दर्जेदार कृषि निविष्ठांची खरेदी ही अधिकृत कृषि निविष्ठा विक्रेत्यांकडुन करावी असे आवाहन केले. उपस्थितांना प्रतिबंधित एचटीबीटी बियाण्याचे दुष्परिणाम बाबत ध्वनीचित्रफित दाखविण्यात आली. कार्यक्रमाच्या शेवटी धुळे जिल्हा सिड्स पेस्टीसाईड्स, फर्टीलायझर डीलर्स असोसियनचे अध्यक्ष मानसिंग गिरासे यांनी विक्रेत्यांच्यावतीने मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमास तालुका कृषि अधिकारी साक्री योगेश सोनवणे, तालुका कृषि अधिकारी, धुळे वाल्मीक प्रकाश, प्र.तालका कृषि अधिकारी, शिंदखेडा सुधीर ईशी, कृषि अधिकारी (सा), पंचायत समिती, धुळे जगदिश बोराळे, पंचायत समिती, शिरपुर राजेशकुमार चौधरी, कृषि अधिकारी (सा), पंचायत समिती, शिंदखेडा योगेश गिरासे, विस्तार अधिकारी (कृषि), पंचायत समिती, साक्री चेतन शिरसाठ उपस्थीत होते.
कार्यक्रमांचे सूत्रसंचलन तालुका कृषि अधिकारी, शिरपूर, संजय पवार यांनी तर कृषि विकास अधिकारी सिताराम चौधरी यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोहिम अधिकारी, जिल्हा परिषद, धुळे प्रदिपकुमार निकम व जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरिक्षक अरुण तायडे यांनी परिश्रम घेतले. असे जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी भास्कर जाधव यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर